घरCORONA UPDATECoronavirus: अमेरिकेत वाघाला कोरोनाची लागण

Coronavirus: अमेरिकेत वाघाला कोरोनाची लागण

Subscribe

प्राणिसंग्रहालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यामार्फत विषाणुचा संसर्ग झाल्याचं सांगितलं जात आहे.

अमेरिकेतील कोरोना विषाणुचे संकट सतत वाढत आहे. दरम्यान, न्यूयॉर्क प्राणिसंग्रहालयात वाघाला कोरोना विषाणुची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. प्राणिसंग्रहालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यामार्फत विषाणुचा संसर्ग झाल्याचं सांगितलं जात आहे. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात चार वर्षांच्या वाघाला कोरोनाची लागण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, वाघामध्ये संसर्ग प्राणीसंग्रहालयाच्याच एका कर्मचाऱ्यामार्फत झाला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेत या वाघाच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. ताज्या माहितीनुसार अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे २४ तासांत १२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा ९ हजार ६१८ वर पोहोचला आहे.


हेही वाचा – Coronavirus: ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन रुग्णालयात दाखल

- Advertisement -

दरम्यान, १ मार्च रोजीच ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालय नागरिकांसाठी बंद केलं गेलं होतं. वाघीण नादिया आणि प्राणीसंग्रहालयातील पाच इतर वाघ आणि सिंह यांना श्वसनाच्या आजाराची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली. इतर प्राण्यांमध्ये अद्याप अशी कोणतीही चिन्हे दिसली नाहीत.

याआधी बेल्जियममध्ये एका पाळीव मांजरीला कोरोनाची लागण झाली होती. बेल्जियममध्ये राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिची मांजरही आजारी पडली. यामुळे डॉक्टरांनी तीचीही तपासणी केली त्यावेळी त्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -