घरहिवाळी अधिवेशन २०१८'सीमांकनानंतर' जागा नावावर करणार - चंद्रकांत पाटील

‘सीमांकनानंतर’ जागा नावावर करणार – चंद्रकांत पाटील

Subscribe

सीमांकनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर कोळीवाड्यातील जागा कोळीबांधवांच्या नावावर केली जाईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली.

मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर तेथील जागा कोळीबांधवांच्या नावावर केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. दरम्यान, अरबी समुद्रात उभे राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पुन्हा एकदा कोळी बांधवांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ऍड. राहुल नार्वेकर यांनी याविषयी लक्षवेधीच्या संदर्भात मुद्दा उपस्थित करून मुंबईतील कोळीवाडे आणि त्यांचे काही प्रश्न हे शिवस्मारकाच्या संदर्भात आहेत, त्यांचा विचार करावा अशी मागणी केली होती. त्यावर त्यांचेही मत विचारात घेतले जाईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली. राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील ७ कोळीवाड्यांचे सीमांकन हे झाले आहे. याच धर्तीवर कफपरेड कोळीवाड्याचे सीमांकन करावे, शासनाच्या धोरणामुळे येथील कोळीबांधवांचे स्थलांतर झाले होते. यामुळे शासनाने सुरू केलेले सर्वेक्षण रखडले आहे. ते तात्काळ मार्गी लावून न्याय येथील कोळीवाड्याना न्याय द्यावा, तसेच सीमांकानाचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी नार्वेकर यांनी केली.

याशिवाय कफपरेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होणार आहे. या स्मारकाला स्थानिक कोळी बांधवांचा विरोध नाही, मात्र त्यांच्या काही समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी शासनाने विशेष बैठक लावावी, अशी मागणी नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. त्यावर उत्तर देताना पाटील यांनी सरकारने कोळीवाड्यांचे सीमांकनाचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. सीमांकन झाल्यानंतर तेथील जागा कोळी बांधवांच्या नावावर करण्याचे सरकारने प्रस्तावित केले आहे. तर कफपरेड कोळीवाड्याबाबत ५ ते १० डिसेंबरपर्यंत बैठक लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. काँग्रेसचे भाई जगताप यांनी, कफपरेड कोळीवाड्याबाबत योग्य निर्णय घ्यावा आणि येथील स्थानिकांना बाहेर कुठेही जाण्याची वेळ येणार नाही अशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -