घरहिवाळी अधिवेशन २०१८गोंधळात पुरवण्या मागण्या मांडणे लोकशाहीच्या विरोधात - जयंत पाटील

गोंधळात पुरवण्या मागण्या मांडणे लोकशाहीच्या विरोधात – जयंत पाटील

Subscribe

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी आज सरकारने पुरवण्या मागण्या रेटून नेण्याचा प्रयत्न केला. गोंधळामध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुरवणी मागण्या मतास टाकून पास करुन घेतल्या. हे लोकशाहीच्या चर्चेचे औचित्य सोडून केलेली कृती आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच आज पारीत केलेल्या पुरवणी मागण्या रद्द करुन त्याच्यावर उद्या पुन्हा चर्चा घेण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

विधानसभेमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Posted by Nationalist Congress Party – NCP on Monday, 26 November 2018

- Advertisement -

मराठा आणि धनगर समाजाचा टीसचा अहवाल आणि पुरवण्या मागण्या यावरुन आज विधानसभेत जोरदार गोंधळ निर्माण झाला. या गोंधळातच सरकारने पुरवण्या मागण्या मजुंर करुन घेतल्या. अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीमध्ये ठरलेले असतानाही सरकारकडून पुरवण्या मागण्या गोंधळात मंजुर करुन घेतल्याने आमदार जयंत पाटील यांनी दालनात ठरल्याप्रमाणे सरकार वागत नसल्याचा आरोप केला आणि पुरवण्या मागण्यावर उदया चर्चा घ्यावी अशी मागणी केली. त्यावर अध्यक्षांच्या दालनामध्ये चर्चाही ठरली परंतु त्याअगोदर दालनात ठरलेल्या विषयानुसार चर्चा झाली तरच बैठक होईल असे आमदार जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे सुरुवातीला १५ मिनिटासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

सभागृहात मांडण्यात आलेल्या २० हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या रद्द करा आणि उदया चर्चा घ्या शिवाय दुष्काळावर आम्हाला चर्चा करायची आहे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी अजून एक आठवडा वाढवावा अशी मागणीही आमदार जयंत पाटील यांनी केली.

- Advertisement -

दरम्यान सरकार योग्य ती चर्चा करत नसल्याने विधीमंडळ पक्षनेते अजितदादांसह सर्वच विरोधी सदस्य सभागृहात बैठक मारुन बसले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी अध्यक्षांच्या दालनामध्ये चर्चेसाठी विरोधी सदस्यांना विशेषत: अजितदादा यांना चर्चेला पाचारण केले मात्र मराठा आणि धनगर समाजाचा टीसचा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका अजितदादा पवार आणि विरोधी सदस्यांनी घेतली. मात्र त्यानंतरही सरकार व्यवस्थित चर्चा करायला तयार नसल्याने विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे मराठा अहवाल आणि धनगर समाजाचा टीसचा अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी केली. शिवाय पुरवण्या मागण्यांची चर्चा उदया घ्यावी अशी जोरदार मागणी केली त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकुब करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -