Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी माझ्यावर विषप्रयोग कोणी केला हे मला कळले, पण पुरावे नव्हते

माझ्यावर विषप्रयोग कोणी केला हे मला कळले, पण पुरावे नव्हते

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खळबळजनक माहिती

Related Story

- Advertisement -

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाला होता. ही माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. १९६३ मध्ये लता मंगेशकर हे नाव सर्वश्रुत झाले होते. लता मंगेशकर यांना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. अशात त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. हा विषप्रयोग कुणी केला? हे मला कळले होते पण माझ्याकडे पुरावा नव्हता, असे आता लता मंगेशकर यांनी म्हटले आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

काय म्हटले आहे लता मंगेशकर यांनी?
ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी माझ्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. मी खूप आजारी झाले होते. मी थोडेथोडके नाही जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. त्यावेळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाहीत. मात्र, त्या अफवा होत्या. एकाही डॉक्टरने मला हे सांगितले नव्हते की तुम्हाला पुन्हा गाता येणार नाही. डॉ. आर.पी. कपूर यांनी मला बरे केले. त्यांनी मला या आजारातून बरे केले. तीन महिने माझे गाणेही बंद होते. मला भयंकर अशक्तपणा आला होता. त्यावेळी मी इतके अशक्त झाले होते की मला उठून चालताही यायचे नाही. मी भविष्यात चालू शकेन की नाही असाही प्रश्न निर्माण झाला होता.

- Advertisement -

हा विषप्रयोग कुणी केला?
विषबाधा कुणामुळे झाली होती हा प्रश्न विचारला असता माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते आम्हाला कळले होते. पण त्या व्यक्तीविरोधात आम्ही काहीही कारवाई केली नाही. कारण आमच्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या माणसाच्या अशा वागण्याचे आम्हाला नवल वाटले होते, असे लता मंगेशकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -