घरताज्या घडामोडीCorona: रायगड जिल्ह्यात ३५९ रुग्णांची नोंद; १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Corona: रायगड जिल्ह्यात ३५९ रुग्णांची नोंद; १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात तब्बल १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ३५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात तब्बल १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ३५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या २१ हजार ९३० वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्या ६६१ वर पोहोचली आहे.

या ठिकाणी आढळून आले कोरोनाबाधित

आज आढळून आलेल्या ३५९ रुग्णांपैकी पनवेल मनपा हद्दीतील १३९, पनवेल ग्रामीण मधील ३७, उरण मधील १५, खालापूर ३१, कर्जत १२, पेण २३, अलिबाग ३८, मरुड ०, माणगाव २४, तळा ०, रोहा ३, सुधागड ५, श्रीवर्धन ५, म्हसळा १, महाड २१, पोलादपूर ५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ७, पनवेल ग्रामीण १, उरण ३, खालापूर १, श्रीवर्धन २, महाड १, अशा एकुण १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी दिवसभरात ५०० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

तर रायगड जिल्ह्यातील ७६ हजार ३६७ जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३५२ रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ३६३, पनवेल ग्रामीण हद्दीतील ३९७, उरण मधील १९०, खालापूर २२४, कर्जत ६९, पेण २४२, अलिबाग २५७, मुरुड ३५, माणगाव १११, तळा येथील १२, रोहा १८७, सुधागड २७, श्रीवर्धन ३९, म्हसळा ९, महाड १७३, पोलादपूर मधील १७ कोरोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ८२ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे.


हेही वाचा – Corona: औरंगाबादमध्ये बाधितांची संख्या १९ हजार पार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -