घरताज्या घडामोडीकशेडी घाटात बसचा मोठा अपघात; चिमुरड्याचा मृत्यू, १५ जण जखमी

कशेडी घाटात बसचा मोठा अपघात; चिमुरड्याचा मृत्यू, १५ जण जखमी

Subscribe

मुंबईतून कणकवलीकडे निघालेली खासगी बस दरीत कोसळल्याचे समोर येत आहे. पहाटे ०४.१५ सुमारास कशेडी घाटात हा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत असून सध्या बचाव कार्य सुरू आहे.  या अपघातग्रस्त बसमधून एकूण २७ प्रवासी प्रवास करत होते. या बसमधील ८ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना पोलादपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज (गुरुवारी) पहाटे ०४.१५ सुमारास मुंबईतून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला कशेडी घाटातील भोगाव गावाजवळ मोठा अपघात झाला. एका मोठ्या झाडांमुळे ही बस अडकली, अन्यथा १ हजार फूट खोल दरीत कोसळून मोठा अनर्थ अटळ होता. माहितीनुसार, या बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. अपघात घडला तेव्हा सर्वजण झोपेत होते. महाडच्या प्रशांत साळुंखे रेस्क्यू टीमच्या ६ ट्रेकर्सनी जखमींना बसमधून बाहेर काढून वरती आणले. दुर्दैवाने एका ८ वर्षीय चिमुरड्याचा या अपघात मृत्यू झाला आहे. या मृत चिमुरड्याचे नाव साई राणे असे आहे. या अपघातमध्ये जखमी झालेल्या १५ जणांवर पोलादपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलादपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे. या अपघाताच नेमकं कारण अद्याप समजले नाही आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून केली हत्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -