Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम विवाहितेबरोबरच लफडं पडलं महागात, बॉयफ्रेंड गोणीतून थेट नाल्यात

विवाहितेबरोबरच लफडं पडलं महागात, बॉयफ्रेंड गोणीतून थेट नाल्यात

अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून शेतकऱ्याला गोणीत बांधून थेट नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे.

Related Story

- Advertisement -

विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून शेतकऱ्याला गोणीत बांधून थेट नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; गुजरातच्या खेडा येथील चिकलोदी गावात राहणाऱ्या जीवन राठोड या २९ वर्षीय व्यक्तीचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. हे दोघेही एकमेकांना भेटत असत. तसेच त्यांचे सातत्याने फोनवर देखील बोलणे होत होते. याबाबत महिलेच्या घरातल्यांना कळले. त्यांनी याबाबत महिलेला जाब देखील विचारला. पण, त्यांची भेट आणि बोलणे काही थांबले नाही. अखेर महिलेच्या भावांनी आपला राग व्यक्त करत जीवन राठोडला एका गोणीत भरले आणि ती गोणी बांधून नाल्यात फेकून दिली. नाल्यात फेकल्यानंतर राठोडने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, स्थानिक व्यक्तींना गोणीतून आवाज ऐकू आला. त्यानंतर त्यांनी याची तात्काळ दखल घेत पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर राठोड याची तब्बल २४ तासांनी सुटका झाली.

२४ तासांनंतरही जिवंत

- Advertisement -

जीवन राठोड याचे नशीब बलवत्तर होतं म्हणून गोणीत बांधून नाल्यात फेल्यानंतरही तो २४ तासांनंतरही जिवंत होता. याप्रकरणी संबंधित महिलेच्या दोन्ही भावांना अटक केली असून त्यांच्याविरोधात अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्ह्याची नोंद केली आहे.


हेही वाचा – गावावरुन मदतीसाठी बोलावलेल्या तरुणीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी


- Advertisement -