धक्कादायक! …यासाठी नणंदेचे अश्लील फोटो पाठवून नवऱ्याला करत होती ब्लॅकमेल

नणंदेचे अश्लील फोटो पाठवून नवऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

army man blackmail by wife with his sister images in indore
धक्कादायक! ...यासाठी नणंदेचे अश्लील फोटो पाठवून नवऱ्याला करत होती ब्लॅकमेल

लष्करी सेवेत असलेल्या नवऱ्याला त्याच्याच बहिणीचे अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल करण्याची धक्कादायक घटना इंदूरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची तक्रार दाखल होताच आरोपी महिलेला जबलपूरमधून अटक करण्यात आली आहे. या विचित्र घटनेची चौकशी केली असता याचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

इंदूरच्या महू येथे राहणाऱ्या एका महिलेने लष्करी सेवेत असलेल्या एका जवानाला त्याच्याच बहिणीचे अश्लील फोटो पाठवले. हे फोटो पाठवताना महिलेने वेगवेगळ्या whatsapp नंबरचा वापर केला होता. अखेर या जवानानी याप्रकरणाची राज्याच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक जितेंद्र सिंह यांनी दिली. त्यानंतर याप्रकरणी तपासाला सुरुवात करण्यात आली.

मिळालेल्या महितीनुसार; पोलिसांनी ज्या मोबाईल नंबरवरुन फोटो आले आहेत. त्या मोबाईलचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर एका महिलेला जबलपूरमधून अटक करण्यात आली. या महिलेची कसून चौकशी केली असता आपला नवरा लष्करी सेवेत असून आपणच त्याला त्याच्या बहिणीचे अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल करत असल्याचे महिलेने सांगितले. हे ऐकल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले. पोलिसांनी यामागचे कारण विचारले असता तिने जे कारण सांगितले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

ती म्हणाली, ‘आपल्याला नवऱ्याकडून घटस्फोट हवा आहे. त्यासाठी कुटुंब न्यायालयात खटला सुरु आहे. याप्रकरणी पतीने राजीखुशीने आणि परस्पर सामंजस्याने घटस्फोट द्यावा, अशी तिची मागणी होती. यासाठी पतीवर दबाव टाकण्यासाठी वेगवेगळ्या whatsapp नंबरचा वापर करत त्याला फोटो पाठवले. याप्रकरणी आरोपी महिलेच्या भावाविरोधात २०१९ मध्ये सायबर सेल विभागात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.


हेही वाचा – मराठी तरुणीची ऑनलाईन फसवणूक; चोर म्हणतो माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कनेक्शन