घरठाणेक्वारंटाईन सेंटरमध्ये २० वर्षीय महिलेवर बलात्कार; पीडितेच्या पतीने दिला घटस्फोट

क्वारंटाईन सेंटरमध्ये २० वर्षीय महिलेवर बलात्कार; पीडितेच्या पतीने दिला घटस्फोट

Subscribe

मीरा-भाईंदर महापालिकेच्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये २० वर्षीय महिलेवर तीन महिन्यांपूर्वी चार दिवस महापालिकेच्याच ठेका पद्धतीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर महिलेचा घटस्फोट झाला. विक्रम शेरे (२७) असे आरोपीचे नाव असून तो महापालिकेत ठेका पध्दतीवर सैनिक सिक्युरिटी एजन्सीमार्फत काम करतो.

महापालिकेच्या गोल्डन नेस्ट परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक असलेला विक्रम शेरे संशयित रुग्णांना रात्री दूध आणि गरम पाणी देण्याचे काम करीत होता. त्या संधीचा फायदा उचलत त्याने याठिकाणी दाखल असलेल्या वीस वर्षीय तरुणीवर २ जून ते ५ जून दरम्यान वारंवार बलात्कार केला. हा प्रकार कुठे सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. मात्र, ती गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेमुळे पीडितेचा घटस्फोटही झाला.

- Advertisement -

पीडितेच्या घरातील एक ३२ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्याने घरातील सात जणांना ३१ मेला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी पीडित महिला आपल्या ७ महिन्यांच्या मुलीसह क्वारंटाईन सेंटरमधील रुम नं. १०७ मध्ये ५ जूनपर्यंत होती. विक्रम त्याचवेळी याठिकाणी रात्री दूध आणि गरम पाणी देण्याचे काम करीत असे. त्याने २ जून ते ५ जूनपर्यंत धमक्या देत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार महिलेने नवघर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून विक्रमला अटक केली.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून शनिवारी रात्री गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
– संपत पाटील, पोलीस निरीक्षक

ही अतिशय गंभीर घटना आहे. त्यामुळे या प्रकरणात महापालिका अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. भाजप क्वारंटाईन सेंटरमध्ये यशोपी समिती नेमा अशी गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी करीत आहे. पण, त्यावर अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नाही.

सैनिक सिक्युरिटी सुरक्षा रक्षकांना कामावर ठेवताना त्यांची चारित्र्य पडताळणी करीत नाहीत. गुन्हेगार प्रवृत्तीच्या सुरक्षा रक्षकांमुळे अनेकदा वादाचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सैनिक सिक्युरिटीचा ठेका रद्द करण्यासंबंधी मी महापालिका प्रशासनाला पत्र देणार आहे. – ज्योत्स्ना हसनाळे, महापौर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -