ऑस्ट्रेलियातील ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या कोरोना लसीचे उत्पादन सुरू

जवळपास ३ कोटी डोस तयार होणार आहेत

australia begins production of oxford developed covid 19 vaccine
ऑस्ट्रेलियातील ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या कोरोना लसीचे उत्पादन सुरू

 

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावर प्रतिबंधक लसीसाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. त्यात आता ऑस्ट्रेलियाच्या ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीत कोरोना लसीचे उत्पादन करण्याचे काम सुरू झाले आहे. कोरोना लसीचे स्थानिक पातळीवर उत्पादन घ्यायला सुरूवात केली आहे. ज्यातून जवळपास ३ कोटी डोस तयार होणार आहेत, असं सांगितलं जात आहे. सिन्हुआ एजेंसीच्या अहवालानुसार, लसीच्या क्लिनीकल ट्रायलनंतर त्याचे फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राजेनेका सह जागतिक पातळीवर लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे.

सीएसएलच्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी एंड्रयू नैश यांनी म्हटले आहे की, आम्ही लसीचे उत्पादन अॅक्टिव्हिटी रिस्क घेऊन करत आहोत, त्याचप्रमाणे आम्ही त्याची क्लिनीकल ट्रायल करण्यावरही लक्ष देणार आहोत. आम्हाला अशी आशा आहे की, प्रत्येक व्यक्तीला ही कोरोना लस घेण्याची आवश्यकता असेल. त्यामुळे ही लस प्रवाभीपणे १.५ कोटी लोकांपर्यत पोहोचवता येईल. परंतु ऑस्ट्रेलियाच्या सरकारी नियामक प्राधिकरणानुसार, चिकित्सकीय सामान प्रशासनच्या (टीजीए ) अनुमतीशिवाय कोरोना लसीचा वापर करता येणार नाही.

एस्ट्राजेनेका ही जैवतंत्रज्ञानातील एक आघाडीची कंपनी आहे. या कंपनीने पुणेच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एस्ट्राजेनेका आणि ऑस्ट्रेलियाच्या ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीकडून विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या चाचणीचे सकारात्मक निकाल समोर आले होते. मात्र आता ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी कोरोना लसीचे उत्पादन करण्याला सुरूवात केली आहे. या लसीचा जागतिक पातळीवरील प्रयोग यशस्वी झाला तर जगात कोरोना लसीचा प्रश्न मार्गी लागेल.


हेही वाचा – सलग ३७ दिवस बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक