घरताज्या घडामोडीभ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दोन दिवसातच बिहारच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दोन दिवसातच बिहारच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा

Subscribe

सातत्याने भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन टीकेचे धनी ठरलेल्या बिहारच्या शिक्षण मंत्र्यांनी अखेर गुरुवारी राजीनामा दिला. नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमध्ये शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झालेल्या मेवालाल चौधरी यांच्यावर सहाय्यक प्राध्यापक भरतीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. यावरुन प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांनी जोरदार टीका केली. तसेच नितीश कुमार आणि भाजपवर भ्रष्टाचार्‍यांना मंत्री केल्याचा आरोप केला. यानंतर चौधरी यांनी राजीनामा दिला आहे.

मेवालाल चौधरी यांनी बुधवारी नितीश कुमार यांची मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. आता चौधरी यांचा राजीनामा बिहारच्या राज्यपालांना मिळाला आहे. मेवालाल यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विरोधी पक्षांनी नितीश कुमार यांना धारेवर धरल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर राजदचे नेते आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यावर 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले आहे.

- Advertisement -

मेवालाल चौधरी म्हणाले, कोणत्याही प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यावर किंवा न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच संबंधित आरोपी दोषी सिद्ध होतो. माझ्याविरोधात ना कोणते आरोपपत्र दाखल आहे, ना निकाल देऊन दोषी ठरवले आहे. यावेळी मेवालाल यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहे. तसेच तेजस्वी यादव यांनी बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -