अन्वय नाईक यांची जमीन रश्मी ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी खरेदी केली; सौमय्यांचा आरोप

माजी खासदार, भाजपचे नेते किरीट सोमैया

भाजप नेते किरीट सौमय्या यांनी पत्रकार परिषदेद्वारे ठाकरे कुटुंबियांवर आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबाकडून रायगड जिल्ह्यात जमीन विकत घेतली होती. ठाकरेंनी याठिकाणी जमीन विकत घेण्याचे कारण काय? तसेच अशाप्रकारचे किती व्यवहार त्यांनी केले आहेत? या व्यवहाराचा आणि अर्णबच्या अटकेचा काही संबंध आहे का? असे प्रश्न किरीट सौमय्या यांनी उपस्थित करुन खळबळ उडवून दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन खरेदी केली होती. सोमय्या यांनी या जमीन खरेदीची कागदपत्रे ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

जमीन खरेदी करणे चूक आहे का? रवींद्र वायकर यांचा पलटवार

खरेदी झाली होती. हा व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाला आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात या व्यवहाराचा उल्लेख केलेला आहे. आयकर विभागाला देखील याचे दस्ताऐवज दिलेला आहे. त्यामुळे हा पारदर्शक व्यवहार असून विरोधक याचे राजकारण करत आहेत. लोकायुक्तांमार्फत या प्रकरणाची आधीच चौकशी झालेली आहे, आणखी काही चौकशी करायची असेल तर करु शकता, असे आव्हानच वायकर यांनी केले. अन्वय नाईक यांनी जमीन विकल्यापेक्षा त्यांनी आत्महत्या कुणामुळे केली? याचा शोध घेतला पाहीजे.