घरताज्या घडामोडीविविध मागण्यांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय समोर भाजपचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय समोर भाजपचे आंदोलन

Subscribe

सरकारवर आंदोलन दडपण्याचा भाजपचा आरोप

विविध मागण्यांसाठी शक्रवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय समोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. महाविकास आघाडीकडून मात्र हे आंदोलन दडपण्याचे काम करत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मनाई आदेश नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तरी हे आंदोलन होणारच असा ठाम निर्धार भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जणाठे यांनी करून कार्यकर्त्यांनी जसे जमेल तसे आंदोलनास पोहचावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

आज २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास हे आंदोलन पालघरच्या हुतात्मा चौकातून पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकणार होते. पालघर जिल्ह्यातील नगरपंचायती मधील भ्रष्ट्राचार, भूकंप बाधितांना नुकसान भरपाई द्यावी,
कुपोषण, शेतीविषयक मागण्या आदींवर हे आंदोलन होत आहे. मात्र कार्यकर्त्यांची धरपकडीने हे आंदोलन चिरडले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या आंदोलनाला माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर उपस्थित आहेत.

- Advertisement -

विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन

विविध मागण्यासाठी शुक्रवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय समोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. मात्र हे आंदोलन दडपण्याचा प्रकार महाविकास आघाडीकडून दडपल्याचा आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मनाई आदेश नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तरी हे आंदोलन होणारच असा ठाम निर्धार भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जणाठे यांनी करून कार्यकर्त्यांनी जसे जमेल तसे आंदोलनास पोहचावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, 19 November 2020

शेतकऱ्यांना रु. ५० हजार हेक्टरी सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, डहाणू नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर नगरपरिषदेतील भ्रष्टाचार, वाडा नगरपंचायतमधील भ्रष्टाचार, विक्रमगड नगरपंचायतमधील भ्रष्टाचार, प्रलंबित वनदावेतातडीने मंजूर करावे व वनाधिकाऱ्यांची मुजोरी बंद करा, रोजगार हमीचीकामे त्वरित चालू करा, नामांकित शाळामंध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेश त्वरित चालू करा, जिल्ह्यातील मंजूर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा व जिल्हापरिषद बांधकाम खाते व सार्वजनिक बांधकामखात्यातील भ्रष्टाचारी अधिकारी व ठेकेदारांचीचौकशी करून कारवाई करा, जिल्हाकृषी अधिकारी कार्यालयामधील भ्रष्टाचाराची चौकशी करा व रब्बी हंगामासाठी बियाणे त्वरित द्या, वाढीव वीजबिले त्वरित रद्द करा जिल्ह्यामधील भात खरेदी केंद्र त्वरित चालू करावेत, शेतकऱ्यांचा सर्व भात खरेदी करावा, आदिवासी जनतेसाठी खावटी कर्ज त्वरित वाटप करा, कुपोषण निर्मूलन उपाययोजनेतील भ्रष्टाचार त्वरित थांबवा, बालमृत्यूचे प्रमाण थांबवा, जिल्ह्यातील सी.एस.आर. फंडामार्फत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करा (कोकाकोला कंपनी कुडूस), जिल्ह्यात सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पामध्ये स्थानिक कामगारांची भरती करा (अदानी प्रकल्प, सदभावना दापचरी चेक पोस्ट, कॅप्सूल कंपनी आशागड), मुंबई ते वडोदरा एक्सप्रेस हायवेमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे मोबदला द्या, डहाणू, तलासरी व पालघर तालुक्यातील भूकंप प्रवणक्षेत्रातील लोकांना भूकंपामुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी आदी मागण्या घेऊन भाजपने हे आंदोलन केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -