ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला म्हणाला ‘कलियुगातील द्रौपदी’, मग झाली अटक

सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे या माध्यमाचा वापर करुन बदनामी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

break-up caused the boyfriend girlfriend's WhatsApp became Defamation
ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला म्हणाला 'कलियुगातील द्रौपदी', मग झाली अटक

ब्रेकअप झाल्याच्या रागातून प्रियकर किंवा प्रेयसी एकमेकांचा बदला घेण्यासाठी विविध कल्पना लढवतात. यातून कधीकधी नाहक बदनामी देखील होते. सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे या माध्यमाचा वापर करुन बदनामी करण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावर प्रेम होतं आणि तुटतंही. अशीच एक घटना गुजरातमध्ये घडली आहे. प्रेयसीने ब्रेकअप केल्यानंतर प्रियकराने तिची सोशल मीडियावरून बदनामी केली. प्रेयसीचा फोटो आपल्या व्हॉट्सअप डिपीवर अपलोड करून ‘कलियुगातील द्रौपदी’ असं कॅप्शन दिलं. हा प्रकार प्रेयसीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.

पीडित मुलगी ही गुजरातच्या राजकोट येथे राहते. हितेष नावाच्या मुलासोबत तिचे काही दिवसांपूर्वी प्रेमसबंध जुळले होते. राजकोटमध्येच या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. पण थोड्याच दिवसांत त्यांच्यातले प्रेम आटले. प्रियकर पीडितेला सतत त्रास देऊ लागला. त्यामुळे प्रेयसीने हे नातं कायमचं तोडून टाकलं. पीडित मुलीचं हितेष सोबत ब्रेकअप झालं. त्यानंतरही प्रियकर प्रेयसीला त्रास देऊ लागला. प्रेयसीने प्रियकाराला बऱ्याचदा समजावूनही तो ऐकत नव्हता.

प्रेयसी भाव देत नाही, हे पाहून प्रियकराने तिची सोशल मीडियावरून बदनामी करायला सुरूवात केली. प्रियकराने प्रेयसीचा फोटो व्हॉट्सअपवर अपलोड करून तिची बदनामी केली. ‘कलियुगाची द्रौपदी’ असं म्हणून प्रियकराने प्रेयसीचा फोटो आपल्या व्हॉट्सअप डिपीवर अपलोड केला. त्याचबरोबर तो प्रेयसीला व्हॉट्स अपवरून अश्लिल मेसेज आणि व्हिडिओ पाठवत होता. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित तरुणी त्रासली होती. तिने प्रियकराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.


हेही वाचा – ९ वर्षांनी पकडला गेला खुनी मुलगा, सावत्र आईची हत्या करून झाला होता फरार