Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जव्हारमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने बालमृत्यू

जव्हारमध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने बालमृत्यू

Related Story

- Advertisement -

जव्हारमधील अतिदुर्गम आदिवासी भागातील एका गरोदर महिलेला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने ती उपचाराअभावी जंगलातच प्रसूत झाली. मात्र, बाळाचा मृत्यू झाला. मोखाड्यात दोन आठवड्यातील ही दुसरी घटना.

कल्पना राजु रावते (24) ही गरोदर महिला पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील हुंबरन या पाड्यातील रहिवासी आहे. हा पाडा दुर्गम भागातील असून याठिकाणी ये-जा करण्यासाठी रस्ताही नाही. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास तिच्या पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पतीने धावाधाव सुरू केली. महिला असून त्यांना प्रसूतीवेदना होऊ लागल्याने प्रसूतीसाठी वेळेत उपचार न मिळाल्याने बालमृत्यू ओढवला आहे.

- Advertisement -

गाडी शोधण्यासाठी तिचे पती हे चालत किन्हवली या गावात गेले. परंतु गाडीभाडे द्यायला पैसे नसल्याने गाडी उपलब्ध झाली नाही. अ‍ॅम्ब्युलन्सही उपलब्ध झाली नाहीं. प्रस्तुतीवेदना जास्त सुरू झाल्याने कल्पनाला डोलीतून न्यावे लागले. पण, अर्ध्या वाटेतच जंगलात तिने बाळाला जन्म दिला. पण, बाळ मृतावस्थेत जन्माला आले.

हुंबरंग हा गाव पिपंळशेत खरोंडा ग्रामपंचायतमध्ये येत असून हा अती दुर्गम व डोंगरावरील गाव आहे. या गावात रस्ता नसल्याने रुग्णाला डोलीतून न्यावे लागते. ग्रामपंचायतीमध्ये आरोग्यपथक असून देखील स्थानिक आरोग्य केंद्रात वेळेत कर्मचारी व उपचार मिळत नाहीं. 108 क्रमांकाची रुग्णवाहिकाही मिळत नाही. त्यातूनच कल्पनाचे बाळ दगावले. अशा अनेक घटना पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात घडत असतात. पंधरा दिवसांपूर्वी मोखाडा तालुक्यातील मनीषा दोरे या गरोदर महिलेला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वेळेत अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्याने तिचा आणि बाळाचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -