घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईमध्ये कोरोनाचे १ हजार ४३८ नवे रुग्ण, ३८ मृत्यू

Corona Live Update: मुंबईमध्ये कोरोनाचे १ हजार ४३८ नवे रुग्ण, ३८ मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६० हजारांच्या जवळ पोहोचली असतानाच मुंबईतही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मुंबईत आज दिवसभरात १४३८ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या एकूण सापडलेल्या रुग्णांचा आकडा ३५ हजार २७३ झाला आहे. यात आज ७६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ९ हजार ८१७ झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ३८ रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ११३५ झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या प्रशाससानासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. (सविस्तर वाचा)


कोरोनाचीबाधा झालेल्या मालवणी पोलीस स्थानकातील एका पोलीसाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुखमंत्र्यांशी संवाद साधला आहे.

- Advertisement -


उल्हासनगरच्या २६ रहिवाश्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या २७२ झाली आहे. यामध्ये सम्राट अशोक नगर मधील १५ रुग्णांचा समावेश आहे.


अकोल्यात बच्चू कडूंनी केली संचारबंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात चौथ्यांदा लॉकडाऊन करण्यात आला. मात्र, आता हा चौथा टप्पा संपत आला असून पुन्हा लॉकडाऊन वाढणार का याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. लॉकडाऊन ४ हा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे १ जूनपासून पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. मात्र, लॉकडाऊन वाढण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी जाहीर केली आहे. १ ते ६ जून दरम्यान ही संचारबंदी लागू असणार आहे. विदर्भातील अकोला हा करोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


संगमनेरमध्ये एक तर अकोलेत दोन रुग्णांची भर

गेल्या दोन दिवसांत दुपारपर्यंत नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांनी शंभरी पार केली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०३ झाली असून दोन दिवसात संगमनेरमध्ये दोन तर अकोलेमध्ये तीन रुग्णांची भर पडली. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे मुंबईतून आलेले तीन रुग्ण बाधीत सापडल्याने तालुक्यातील रुग्णांची सहावर गेली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


विमान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास राज्य सरकारने २५ मे पासून परवानगी दिली. त्यानंतर विमानाने आकाशात भरारी घेतली खरी. मात्र, काही तास होत नाहीत तर विमानातील एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. ही घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे क्रू मेंबर्सना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


राज्यातील ५ IAS,IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागणी

देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत आहे. भारातात महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात ५५ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनापासून लोकांचे रक्षण होण्यासाठी पोलीस २४ तास तैनात आहेत. पण पोलिसांनाच मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. (सविस्तर वाचा)


चार रुग्णांमुळे अकोल्याला कोरोनाचा विळखा

एकापाठोपाठ एकेक करत अकोले तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण सापडले. त्यामुळे निसर्गसंपन्न अकोल्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण मुंबईसारख्या शहरातून तालुक्यात आले आहेत. लिंगदेव येथे मुंबईवरुन आलेला शिक्षक कोराेनाबाधित आढळत नाही तोच ढोकरी येथे एक रुग्ण आढळला. त्यापाठोपाठ समशेरपूर आणि बुधवारी रात्री चौथा रूग्ण पिंपळगाव खांडमध्ये सापडला. (सविस्तर वाचा)


मागच्या २४ तासांत १३१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांची संख्या २०९५ एवढी झाली आहे. तर ८९७ पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर २२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.


ठाण्यातील मुंब्रा येथे लॉकडाऊनचे नियम लोक पाळत नसल्यामुळे येथे रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. नुकताच रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी येथे रुट मार्च काढून लोकांना नियम पाळण्याचा संदेश दिला.


पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शहरात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४६ वर पोहोचली आहे.


 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा या गावी मुंबईतून गेलेल्या रहिवाश्यांना शेतात क्वारंटाईन केले होते. १४ दिवसांचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर यातील काही नागरिक रस्त्यावर येऊन बसलेले असताना ग्रामस्थांबरोबर त्याचा वाद झाला. या वादाचे रुपांतरी हाणामारीत झाले असून क्वारंटाईन केलेल्या कुटुंबावाला ग्रामस्थांनी जबर मारहाण केली आहे.


मुंबईसह ग्रामीण भागात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. औरंगाबादमध्ये काल एका दिवसात ६ रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसात एवढे बळी जाण्याची औरंगाबादची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे आता एकूण मृतांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. तर एकूण रुग्णसंख्या १,३६२ झाली आहे. राज्यातही काल दिवसभरात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली. काल दिवसभरात १०५ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात मृत्यूंची शंभरी पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता १,८९७ वर पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -