घरCORONA UPDATECorona Live Update: राज्यात आज तब्बल १० हजार ७२५ रुग्ण कोरोनामुक्त

Corona Live Update: राज्यात आज तब्बल १० हजार ७२५ रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

मुंबईमध्ये १०५९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १५ हजार ३४६ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६३९५ वर पोहचला आहे. सविस्तर वाचा

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ६०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ३१ हजार ७१९ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १५ हजार ३१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात २४ तासांत १ हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.८२ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात एकूण १ लाख ४९ हजार २१४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सविस्तर वाचा

- Advertisement -

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असून रहमतनगर येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीचा आज दुपारी मृत्यू झाला आहे. हाचंद्रपूर जिल्ह्यातील पहिला कोविड-१९ चा बळी ठरला आहे.


Delhi Corona: एका दिवसात १,११८ नव्या रूग्णांची नोंद; १ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५७ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७६४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात १ हजार ११८ नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह दिलासादायक बाब म्हणजे १ हजार २०० हून अधिकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त


गेल्या २४ तासांत २३२ पोलिसांना कोरोनाची लागण

संपूर्ण देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता अहोरात्र मेहनत करणाऱ्या पोलिसांनबाबत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. गेल्या २४ तासांत २३२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी १० हजार ३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील कोरेानाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असली तरी माहिम विधानसभा क्षेत्रातील माहिम आणि दादर भागांमध्ये एका दिवसांमध्ये ५९ रुग्ण आढळून आले आहे. तर धारावी विधानसभा क्षेत्रात दिवसभरात केवळ ४ रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीकरांनी निश्वास टाकला असला तरी माहिम-दादरकरांसमोरील टेन्शन अजूनही कायमच आहे. कारण दादरमध्ये ३२ रुग्ण, माहिममध्ये २३ रुग्ण आढळून आले आहेत.


देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यासोबतच आता कोरोना बळींचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. एकीकडे कोरोना रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब देखील समोर आली आहे, ती म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. (सविस्तर वाचा)

कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत असून भारतात सध्या ११ लाख कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या २४ तासांत भारतात ३६ हजार ५६९ रुग्ण बरे झाले असून कोरोनातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच रिकव्हरी रेट आता ६४.५३ टक्के इतका झाला आहे.


मुंबईच्या महापौर यांच्या मोठ्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सुनील कदम असे त्यांचे नाव असून गेल्या सात दिवसांपासून सुनील कदम यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ५७,११७ नवे रूग्ण

देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५७ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७६४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३६ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे. (सविस्तर वाचा)


देशात जुलै महिन्यात ११ लाख रुग्णांची नोंद

जगात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारीही देशात कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाल्याचे बघायला मिळाले आहे. शुक्रवारी पहिल्यांदाच ५५ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली. तर, ७७९ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान, केवळ जुलै महिन्यात भारतात ११.१ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १९ हजार १२२ जणांनाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ३२० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख २२ हजार ११८वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १४ हजार ९९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात २४ तासांत ७ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ५६ हजार १५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -