Corona Live Update: पुण्यात आज दिवसभरात आढळले २,३३१ नवे रुग्ण, ४६ जणांचा मृत्यू!

corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

पुण्यात आज २ हजार ३३१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४६ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ३०९वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ६८ हजार ७७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून २ हजार २३१ रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. तसेच सध्या २६ हजार २७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


गोव्यात आज ३४८ नवे रुग्ण आढळले असून १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ हजार ४२३वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ५ हजार २८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या २ हजार ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईत मागील २४ तासांत १ हजार १२५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १९ हजार २५५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ६ हजार ५८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


राज्यात आज दिवसभरात १० हजार ३०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ६८ हजार २६५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १६ हजार ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


गोव्यात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणे आवश्यक आहे किंवा ते १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहण्याचा पर्याय निवडू शकतात.


औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, बुधवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ५८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार २०८ इतकी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ३६८ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात ४९३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर सध्या ३ हजार ३४७ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


कोरोना व्हायरस या महामाराशी भारतासह जगातील सर्वच देश संघर्ष करत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत देशात ५२ हजार ५०९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे आज पुणे येथे निधन झाले. रात्री २.१५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास असून आज निलंग्यात यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्त झाले असल्याचे सांगत त्यांना दोन दिवसांपूर्वीच घरी सोडण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी जाहीर केले होते. दरम्यान, त्यांचा बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाला असून आज त्यांचे शव पुण्याहून निलंग्याकडे रवाना होणार आहे. तसेच आज दुपारी अंत्ययात्रा निघणार असून आजच अंतिम संस्कार केले जाणार आहेत. (सविस्तर वाचा)


राज्यात मंगळवारी ९ हजार ५०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज ९,९२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण २,७६,८०९ करोनाबाधित रुण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ६२.७४ टक्के एवढं झालं आहे.