Corona Live Update: मुंबईत २४ तासांत आढळले ८६२ नवे रुग्ण!

corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

देशात बाधितांचा आकडा २० लाखांपार!

देशातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली, जी आजपर्यंत एकाच दिवसात कधी झाली नव्हती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत देशभरात कोरोनाची लागण झालेली ६२ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, जे एका दिवसात करण्यात आलेली रेकॉर्ड ब्रेक नोंद आहे. त्यामुळे देशभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या २० लाख २७ हजार ०७५ वर गेली आहे. (सविस्तर वाचा)


नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा

नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलापाठोपाठ चिखलीकरांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींभोवती कोरोनाचा विळखा पडलेला दिसत आहे. चार आमदारांनंतर आता खासदारालाही कोरोना झाला आहे.


मुख्यमंत्र्यांनी बोलावली विभागीय आयुक्तांची बैठक

राज्यातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ३ वाजता विभागीय आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व पालिका आयुक्तांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून यावर सविस्तर माहिती घेण्याकरता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.


देशात आतापर्यंत २ कोटी २७ लाखाहून अधिक चाचण्या!

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ५ लाख ७४ हजार ७८३ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर देशात आतापर्यंत २ कोटी २७ लाख २४ हजार १३४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.


पुणे करोनाने बेजार

पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहर जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल २ हजार ९५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येने आतापर्यंत १ लाखांचा आकडा ओलांडला असून या शहरातील चाचण्यांनीही तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. तर शहरात एका दिवसात १ हजार १९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात ११,५१४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४,७९,७७९ झाली आहे. राज्यात १,४६,३०५ Active रुग्ण आहेत. राज्यात ३१६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६,७९२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.

राज्यात ३१६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५७, ठाणे ३८, नाशिक १३, जळगाव १३, पुणे ४३, पिंपरी चिंचवड १९, सोलापूर १५, कोल्हापूर १३, नागपूर १८ यांचा समावेश आहे. आज १०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३,१६,३७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे झाले आहे.