घरCORONA UPDATECoronavirus Live Update: मुंबईत २४ तासांत १,३५२ नवे रुग्ण, ७३ जणांचा मृत्यू!

Coronavirus Live Update: मुंबईत २४ तासांत १,३५२ नवे रुग्ण, ७३ जणांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजार १४९वर पोहोचला असून मृतांचा आकडा ५ हजार २०२ झाला आहे. सविस्तर वाचा 


राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक ७ हजार ८६२ नवे रुग्ण आढळले असून २२६ रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ३८ हजार ४६१वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ९ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. शुक्रवारी सर्वाधिक ६०६ रुग्ण आढळून आले. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर १९ जूलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ हजार ५३७ वर पोहोचला आहे. शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याणात ३०३, डोंबिवलीत २४२, टिटवाळा, मांडा, पिसवली ६१ रुग्णांचा समावेश आहे. सुमारे ६ हजार ०७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ५ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूची संख्या वाढत असून आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा १७२ वर पोहचला आहे.

- Advertisement -

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरात २ जूलैपासून ते १२ जूलैपर्यंत १० दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने पुन्हा ७ दिवसाचा लॉकडाऊन वाढवला आहे. १२ जूलै सकाळी ७ पासून ते १९ जूलैपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.

सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला असून कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची यशस्वी अमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवसरात्र ड्युटी करत होते. ही ड्युटी करत असताना अनेक पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. अशाचप्रकारे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनमधील ५ पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता हे कर्मचारी उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून पुन्हा आपल्या कार्त्यव्यावर परतले आहेत. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज हे कर्मचारी कोळसेवाडी पोलीस स्टेशनला कामावर रुजू होण्यासाठी आले असता इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. झालेल्या या स्वागताने हे कर्मचारी भारावून गेले असून पुन्हा काम करण्यासाठी नवी उर्जा मिळाली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.


रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात ४३० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात २१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत


आज धारावीत कोरोनाचे १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३५९वर पोहोचला आहे. तर दादरमध्ये आज ३५ आणि माहिममध्ये २३ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दादरमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार १०२ तर माहिममधील १ हजार ३३९ झाला आहे.


देशात गेल्या २४ तासांत ७३ बीएसएफ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून १४ जवान रिकव्हर झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकून कोरोनाबाधित बीएसएफ जवानांचा आकडा १ हजार ६५९वर पोहोचला आहे. यापैकी ९२७ जवान रिकव्हर झाले आहेत.


राज्यात मागील ४८ तासात २२२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर आतापर्यंत ५ हजार ९३५ पोलिसांना कोरोनाचीबाधा झाली असून ७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४ हजार ७१५ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.


हॉस्पिटलमधून पळालेल्या कोरोना रुग्णाचा फुटपाथवरच मृत्यू

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा रुग्ण रुग्णालयाच्या बाहेरील फुटपाथवर पडला होता. तेथील काही स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडीओ तयार केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडल्याचे समोर आले आहे. (सविस्तर वाचा)

डोंबिवलीतील फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण पडून | A corona patient lying on the sidewalk in Dombivli

डोंबिवलीतील फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण पडून | A corona patient lying on the sidewalk in Dombivli

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, July 10, 2020


देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २६ हजार ५०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९३ हजार ८०२ वर पोहोचली असून मृतांची संख्या २१ हजार ६०४ झाली आहे. तसेच २ लाख ७६ हजार ६८५ active केसेस असून ४ लाख ९५ हजार ५१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


राज्यात २४ तासांत ६ हजार ८७५ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून २१९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ९ हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के एवढा आहे. तसेच २४ तासांत ४ हजार ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख २७ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५५.१९ टक्के एवढा झाला आहे. तर सध्या ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -