घरCORONA UPDATECorona Live Update: राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के

Corona Live Update: राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के

Subscribe

Corona Update : मुंबईत कोरोनाचे १२०० नवे रुग्ण

मुंबईमध्ये १ हजार २०० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २७ हजार ५७१ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ हजार ९८८ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये १ हजार २०० नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३० पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ४ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३५ जण हे ६० वर्षांवरील, तर ९ जण हे ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. (सविस्तर वाचा)

- Advertisement -


राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ८१३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ४१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -


पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये कायम सक्रिय राहिलेल्या भोसे गावातील पाटील कुटुंबावर कोरोनानं सर्वात मोठा घाला घातला असून राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील यांचा लहान भाऊ महेश याचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तर त्याच्या दोन दिवस आधी चुलते अनंतराव पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासहीत त्यांच्या परिवारातील तब्बल १२ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवनीत कौर राणा यांच्यावर नागपूर येथील वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


देशात कोरोनाबाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड-१९ ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने २४ लाखांचा टप्पा पार केला आहे. यापैकी आतापर्यंत ४७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १६ लाख ९८ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ५४ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


अयोध्येत मोदींस उपस्थित असलेल्या महंतांना कोरोना झाल्याचे असल्याचे समोर येत आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना कोरोनाची लागण झाली आहे.


देशात १२ ऑगस्टपर्यंत २ कोटी ६८ लाख ४५ हजार ६८८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ८ लाख ३० हजार ३९१ नमुन्यांच्या चाचण्या बुधवारी दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


देशात सर्वाधिक ६६ हजार ९९९ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून यापैकी ९४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४७ हजार ३३ रुग्णांचा मृत्यू झाला असून १६ लाख ९५ हजार ९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६ लाख ५३ हजार ६२२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुलगा अभिजित मुखर्जींनी दिली आहे. १० ऑगस्ट रोजी प्रणव मुखर्जी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.


औरंगाबाद जिल्ह्यात १०५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १७ हजार ७३७वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत औरंगाबादमध्ये ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढ आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, आतापर्यंत जगात २ कोटी ८० लाख ५६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ लाख ४७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ३७ लाख ४ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात बुधवारी दिवसभरात १२ हजार ७१२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३४४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ८ हजार ८८७ नमुन्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी राज्यात १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -