घरCORONA UPDATECorona Live Update: दिलासादायक; राज्यातील ७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

Corona Live Update: दिलासादायक; राज्यातील ७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

Subscribe

राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८६८ झाली आहे. आज राज्यात ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५२ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७५६३ नमुन्यांपैकी १५,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ७० कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३२,५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

CoronaVirus – राज्यात २४ तासात १२० नवीन रूग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा ८६८

- Advertisement -

राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण हे राज्यात आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात १२० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ८६८ झाली आहे.

आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 

पुणे महानगरपालिका – ४१
मुंबई महानगरपालिका – ६८
सातारा – २
अहमदनगर -२
जालना ०२
औरंगाबाद – ३
वसई-विरार – २
नाशिक – १
एकूण – १२०

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात कोरोनाचे ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ३४ वर पोहचला आहे. तसंच आतापर्यंत मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९०वर पोहोचली आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोसायटीमध्ये जाऊन आतापर्यंत १५ लाख लोकांची पाहणी करण्यात आली असून, यातील ६६५ जणांना तपासणी करण्यास सांगितले आहे. तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या घरी जाऊन १४०० जणांचे नमुने घेतले असून त्यातील १३० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर १०९६८ लोकांना आतापर्यंत क्वारंनटाईन करण्यात आले असून ३९९० लोकांनी त्याचा क्वारंनटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. तसेच मुंबईतील २२६ ठिकाणे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.


नाशिकमध्ये आणखीन एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या २ झाली आहे. पहिल्या रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे. तसंच आता आढळलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात कोण कोण आलं आहे. याचा शोध घेतला जात असल्याचं नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

बाहेरून आलेल्यांनी स्वत:हून समोर या, शासनाला मदत करा!

बाहेरून आलेल्यांनी स्वत:हून समोर या, शासनाला मदत करा!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 6, 2020


गेल्या २४ तासात कोरोनाचे ६९३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एकूण ४०६७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यापैकी १४४५ रुग्ण हे तबलीन जमातचे आहेत. आतापर्यंत देशात १०९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसंच २९१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

सविस्तर वाचा – 

Cororna: देशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण, पुरुषांची संख्या महिलांपेक्षा दुपटीने जास्त!


सर्व खासदारांचे ३० टक्के पगार एक वर्षासाठी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या स्वेच्छेने सामाजिक जबाबदारी म्हणून वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व पैसे फंड ऑफ इंडियाकडे जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.


औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एक पुरुष नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती डॉ. कनन येळीकर यांनी दिली.

 


भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत ज्या पद्धतीने कोरोना महामारीच्या विरोधात लढत आहे, त्यानुसार आपण जगासमोर एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केले आहे. भारताने कोरोनाचा धोका वेळीच हेरला आणि त्याविरोधात उपाययोजना राबविल्या. भारताने घेतलेल्या निर्णयामुळेच कोरोनाचा जास्त फैलाव भारतात झाला नाही, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले आहे.


बॉलिवूडची गायिका कनिका कपूर मागच्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह होती. तिचा पाचवा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर आता सहावा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तिला लखनऊच्या संजय गांधी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 

भारतात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मागच्या १२ तासात भारतात ४९० रुग्ण वाढले असून आता एकूण रुग्णांचा आकडा ४ हजारांच्या वर गेला आहे. तर मृत्यू झालेल्या आकड्यातही वाढ होऊन त्याने आता शंभरी पार केलेली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही नवी आकडेवारी जाहीर केली आहे.

 

 


कोरोनाचा कहर भारतात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा आज १३ वा दिवस आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक प्रयत्न करुनही रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसून ती वाढत चालली आहे. देशभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला असून तो आता ३५७८ च्या पुढे पोहोचला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत ८३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक लोक बरे होऊन घरी गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात आता ११ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ६३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -