घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत आज कोरोनाचे १,१७४ नवे रुग्ण

Corona Live Update: मुंबईत आज कोरोनाचे १,१७४ नवे रुग्ण

Subscribe

‘हा’ जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर?

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे मात्र, बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. यातच एक दिलासादायक बातमी म्हणजे नागपूर हा जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे. नागपूरमध्ये सोमवारी आणखी नव्या ७४ बाधितांची भर पडल्याने आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा २ हजार ३५७ पर्यंत गेला आहे. तरी सर्वांत समाधानाची बाब म्हणजे या विषाणूचा विळखा पडल्यानंतर आतापर्यंत १ हजार ५४५ जणांनी यावर मातही केली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे सरासरी प्रमाण ६५.५ टक्के एवढे आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

मुंबईत आज कोरोनाचे १,१७४ नवे रुग्ण

मुंबईमध्ये आज १ हजार १७४ नवे रुग्ण सापडले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३१ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ६ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २८ जण हे ६० वर्षांवरील, तर १३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. ४७ मृत्यू हे गत ४८ तासांमधील आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रात आणखी १० दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला असून २४ जुलै मध्यरात्री १२ पर्यंत कठोरपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

पनवेल मनपा क्षेत्रात ३ ते १४ जुलै पर्यंत लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. रायगड जिल्हा प्रशासनाने पुढील २४ जुलै पर्यंत संपूर्ण रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉक डाऊन घोषित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा क्षेत्रात देखील २४ जुलै पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली आहे. पनवेल मनपा क्षेत्रात सोमवारी १४६ नवे रुग्ण वाढले. रुग्णांची संख्या ३९८० झाली असून २४९६ रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत १३८८ ऍक्टिव्ह रुग्ण असून ९६ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सोमवारी २३३ नवे रुग्ण वाढले असून रुग्णांची एकूण संख्या ९६७८ झाली आहे.


Coronavirus: नवी मुंबईतही कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू

राज्यभरात कोरोनाने हाहाकार उडवला असून कोविड योद्ध्यांनाही आपल्या जाळ्यात ओढलेले आहे. राज्यात आतापर्यंत हजारो पोलिसांनी कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यात आता नवी मुंबईतही एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत असणाऱ्या पोलिसाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. (सविस्तर वाचा)


राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ६ हजार ४९७ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात १९३ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६० हजार ९२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार १८२ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आयसीएमआरचे डायरेक्टर डॉ. भार्गवा यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर टोपे यांनी ही शक्यता वर्तवली आहे.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र


सर्वसाधारणपणे रुग्णालय दवाखाने येथील वैद्यकीय कचरा याची व्हिलेवाट लावण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश असताना सध्याच्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीच्या काळात तर त्याबाबत अधिक खबरदारी घ्यावी. मात्र, असे असतानाही भिवंडी शहरात महानगरपालिका प्रशासनाने कोविड रुग्णालय म्हणून घोषित केलेल्या श्री वऱ्हाळ देवी हॉस्पिटल येथील कचरा थेट पहिल्या मजल्या वरून घंटागाडीत फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .


धारावीमध्ये आज पुन्हा ६ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर दादरमध्ये १९ तर माहिममध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत.


अमिताभ बच्चन यांच्या नजीकच्या संपर्कात असलेल्या स्टाफपैकी २६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर २८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.


राजभवनात आणखी ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राजभवनातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१वर पोहोचली आहे. काल राजभवनात १८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.


औरंगाबाद जिल्ह्यात आज ११३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजार ५७७वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५ हजार ६१ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ३ हजार १६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


देशात २४ तासांत २८ हजार ७०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५०० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ७८ हजार २५४वर पोहोचला असून मृतांचा आकडा २३ हजार १७४ झाला आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यासोबतच आता कोरोना बळींचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ३१वर पोहोचला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८६५वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६१२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रत्नागिरी जिह्ल्यातील कोरोनाचा रुग्णांचा रिकव्हरी रेट ७० टक्क्यांवर पोहोचला आहे.


कर्नाटकचे मंत्री सीटी रवी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह झाला आहे. त्याची पत्नी आणि कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.


जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ३० लाखांहून अधिक जाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात १ कोटी ३० लाख ५ हजार ९४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकील ५ लाख ७१ हजार ५७१ जणांचा मृत्यू झाला असून ७५ लाख ८२ हजार ३५ रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच लाखांच्या वर 

काल राज्यात ७ हजार ८२७ नव्या रूग्णांची नोंद राज्यात झाली असून १७३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत राज्यात २ लाख ५४ हजार ४२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १ लाख ४० हजार ३२५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर मृतांचा आकडा १० हजार २८९ इतका झाला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -