घरठाणेठाणेकरांनो घाबरू नका त्या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे नाही

ठाणेकरांनो घाबरू नका त्या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे नाही

Subscribe

मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्लू निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

देशामध्ये बर्ड फ्लूचे नवे संकट आले आहे. देशातील काही राज्यात बर्ड फ्लूमुळे शेकडो पक्षांचे मृत्यू होत असतानाच ठाण्यातही बगळ्यांच्या मृत्यूमुळे नागरिकांत भीती पसरली होती. मात्र, येथील पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला नसल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी स्पष्ट केले आहे. मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्लू निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले आहे. एव्हिएन एनफ्लूएन्झामुळे केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात शेकडो पक्षांचा मृत्यू झाला झाला असून आम्ही सतर्क आहोत. १० ते १२ पक्षांचा मृत्यू ठाण्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे. या मृत पक्षांचे नमुने आम्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. हे सर्व नमुने बर्ड फ्लू निगेटिव्ह आल्याचे केदार यांनी सांगितले.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन परिसरात मार्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना मृत बगळे दिसले होते. पक्षांच्या मृत्यूमागे काहीतरी मोठे कारण असावे, या अनुषंगाने नागरिकांनी सर्व मृत बगळ्यांना एका जागी जमा केले. तसेच प्रशासनाला याची माहिती दिली होती. त्यानंतर या बगळ्यांना तपासणीसाठी प्रयोगशाळेत नेण्यात आले.

- Advertisement -

पाँड हेरॉन जातीचे 14 बगळे मृतावस्थेत आढळून आले होते. या जातीचे पक्षी साधारणतः पाणवठ्याच्या आसपास आढळून येतात व उंच झाडांवर घरटी बनवतात. एकाच वेळी एवढे पक्षी मेल्याने घटनास्थळी पोहोचलेले ठाणे महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी देखील बुचकळ्यात पडले होते. सध्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे प्रमाण वाढत असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानात आणि हिमाचलप्रदेशात बर्ड फ्लूमुळे कावळे आणि बगळ्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे का? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, या बगळ्यांना बर्ड फ्लू झाला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा – देशात आता बर्ड फ्ल्यूचा धोका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -