घरक्राइममुलीच्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

मुलीच्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

Subscribe

रस्त्यावरून फरफटून लाठी काठीने जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. रूग्णालयात पोहचण्याआधीच पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला.

मुलींचा विनयभंग करणे, छेडझाड करणे या घटना रोज घडत आहेत. त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या फार कमी जणांना न्याय मिळतो. उत्तर प्रदेशमध्ये आपल्या मुलीच्या विनयभंगाची तक्रार करून न्याय मागायला गेलेल्या वडिलांना जिवे मारण्यात आले आहे.ही घटना उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील ईश्वरपूर गावात ही घटना घडली आहे. मुलीच्या विनयभंगाची तक्रार करायला गेलेल्या वडिलांवर लाठी काठीने जिवघेणा हल्ला केला. यात पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. हल्ला करणाऱ्या ८ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भोला प्रसाद असं मृत वडिलांच नाव आहे. ते ५० वर्षांचे होते. देवरियाच्या ईश्वरपूर गावात आपल्या कुंटूबासोबत राहत होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भोला प्रसाद यांची मुलगी घराबाहेर बांधलेल्या गाय आणि बकरीला चारा घालण्यासाठी घराबाहेर आली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रामाशिषच्या घरी पाहुणे आले होते. त्यातील मनीष नावाच्या मुलाने भोला प्रसाद यांच्या मुलीचा विनभंग करण्याच्या प्रयत्न केला. मुलगी घरी आली तेव्हा ती खूप घाबरली होती. घाबरलेल्या मुलीला पाहून वडिलांनी तिला काय झाले विचारले. मुलगी घाबरल्याने काही सांगत नव्हती. तिला धीर दिल्यानंतर मुलीने घडलेली घटना वडिलांना सांगितली.

- Advertisement -

मुली सोबत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने भोला यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रसाद रामेश्वरच्या घरी गेला. मुलीचा विनयभंग करणाऱ्या मनिषच्या त्यांनी कानाखाली वाजवली. त्यांच्यात वाद झाले. झालेल्या प्रकारची पोलिसात तक्रार करण्यासाठी भोला प्रसाद पोलिस स्टेशनच्या दिशेने निघाले. तेवढ्यात रामाशिष आणि त्याच्या काही साथीदारांनी मिळून भोला प्रसादवर हल्ला केला. त्याला रस्त्यावरून फरफटून लाठी काठीने जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. यात भोला प्रसाद गंभीररित्या जखमी झाले. भोलाप्रसादला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. भोला प्रसादची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रूग्णालायात हलविण्यास सांगितले. रूग्णालयात पोहचण्याआधीच भोला प्रसाद यांचा मृत्यू झाला.

देनरियाचे एसपी अधिकारी श्रीपती मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटेनेची लेखी तक्रार नोंदवण्यात आली आहे. घटनास्थळी चौकशीही सुरू आहे. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला म्हणाला ‘कलियुगातील द्रौपदी’, मग झाली अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -