घरताज्या घडामोडीदेवेन भारती सहा वर्षांनंतर साईड पोस्टिंगला!

देवेन भारती सहा वर्षांनंतर साईड पोस्टिंगला!

Subscribe

मुंबईसह राज्य पोलीस दलात शुक्रवारी रात्री उशिरा २४ वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांसह ५० हून अधिक अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे देवेन भारती यांना सहा वर्षांनंतर साईड पोस्टिंगला टाकण्यात आले आहे. ३ सप्टेंबर २०२० रोजी देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांना नवीन पोस्टिंग न दिल्याने ते त्याच पदावरती ९ ऑक्टोबरपर्यंत सव्वा महिने कार्यरत होते. अखेर सव्वा महिन्यानंतर त्यांची केलेली बदली प्रत्यक्षात अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर करण्यात आली आणि ही साईड पोस्टिंग समजली जात आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे एटीएस प्रमुखपद हे महत्त्वाचे पद असल्याने ती जागा रिकामी ठेवता येत नाही, असे गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे होते. त्यामुळेच बदली झाल्यानंतरही देवेन भारती त्याच पदावर कार्यरत होते. भारती यांच्या जागी जयजित सिंग यांना दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख नेमण्यात आले आहे. याशिवाय प्रभात कुमार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, तर नवल बजाज यांना आर्थिक गुन्हे शाखेत अप्पर पोलीस महासंचालक म्हणून पाठवण्यात आले आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना धमक्यांचे फोन येत होते.

- Advertisement -

अखेर एटीएसच्याच पथकाने पश्चिम बंगालमधून मुख्य आरोपीला अटक केली होती. दहशतवाद विरोधी पथक हे राज्यासाठी महत्त्वाचे असल्याने त्यांच्याच पथकाने मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीच्या आरोपीला जेरबंद केले होते. देवेन भारती हे मागील सहा वर्षे मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुखपदी अशा महत्त्वाच्याच पदावर कार्यरत होते. त्यामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. ती नाराजी दूर करण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेन भारती यांची सव्वा महिन्यानंतर ३ सप्टेंबर रोजी एटीएसमधून बदली केली. मात्र, बदली केल्यानंतर त्यांना नवीन पोस्टिंग न दिल्याने ते तेथेच कार्यरत होते. अखेर त्यांची अधिकृत बदली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर करत त्यांना साईड पोस्टिंग दिल्याचे संकेत महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत.

अन्य बदल्यांमध्ये निकेत कौशिक हे आता सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) या पदावर काम पाहतील. तर राजवर्धन यांना महिला अत्याचार प्रतिबंध विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पाठवले आहे. संजय मोहिते यांना विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, तर एम. के. भोसले यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांना मोटार परिवहन विभागात पाठवले आहे. अप्पर पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, तसेच नवल बजाज यांना नव्याने पोस्टिंग देत अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारची प्रशासनावर पकड
देवेन भारती हे मागील सहा वर्षे मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुखपदी अशा महत्त्वाच्याच पदावर कार्यरत होते. त्यामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. ती नाराजी दूर करण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेन भारती यांची ३ सप्टेंबर रोजी एटीएसमधून बदली केली. मात्र, बदली केल्यानंतर त्यांना नवीन पोस्टिंग न दिल्याने ते तेथेच कार्यरत होते. अखेर त्यांची अधिकृत बदली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर करत त्यांना साईड पोस्टिंग देऊन महाविकास आघाडी सरकारने आपली प्रशासनावर पकड असल्याचे दाखवून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -