Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी फराळ परवडेना; ग्राहक काही येईना

फराळ परवडेना; ग्राहक काही येईना

कोरोनामुळे यंदा खवय्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

Related Story

- Advertisement -

दिवाळीचा सण म्हणजे मोठा आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा उत्सव. दिवाळी म्हणजे गोडधोड फराळाचा बेत हे समीकरण. मात्र, यंदा दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट पाहावयास मिळत आहे. यावर्षी कोरोनामुळे दिवाळीतील फराळाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

नोकरी, व्यावसायानिमित्त ज्या कुटुंबियांना फराळ बनविण्यासाठी वेळ नसतो, असे कुटुंब बऱ्याचदा बाजारात तयार असणाऱ्या फराळाला पसंती देतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी तयार फराळ खरेदीसाठी पाठ फिरवली आहे. कोरोनामुळे फराळांच्या दरांमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाची टांगती तलवार पाहता बाहेरील फराळ नको रे बाबा, अशी भूमिका काही ग्राहकांची आहे. परिणामी फराळ विक्री करणारे महिला बचत गट आणि व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले आहे.

किलोमागे ५० रूपये ते ६० रुपये वाढ

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच ते सहा महिने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे या लॉकडाऊनच्या काळात महागाई देखील गगनाला भिडली होती. विशेष म्हणजे अनेक दुकानांमध्ये तुटवडा भासत असल्याने फराळासाठी लागणारे साहित्य (कच्चा माल) यामध्ये देखील दर वाढ झाली आहे. त्यामुळे पदार्थांच्या दरात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फराळातील प्रत्येक पदार्थ हा किलोमागे ५० ते ६० रुपयांनी वाढला आहे.

दिवाळी फराळाचे दर (रूपयांमध्ये)

फराळाचा पदार्थ वर्ष          २०१९ वर्ष              २०२० वर्ष   

- Advertisement -

चिवडा                         २००/-                   २५०/-
चकली                         २५०/-                   ३००/-
बेसन लाडू                १२ रु. एक नग          १५ रु. एक नग
रवा लाडू                  ०८ रु. एक नग          १० रु. एक नग
करंजी                       २६०/-                      २८०/-
अनारसे                      १२०/-                      १५०/-
शेव                           २००/-                      २५०/-
शंकरपाळी                   २००/-                      २५०/-

दरवर्षीचा ग्राहक येतोच

सध्या अनलॉक प्रक्रिया सुरु असल्याने बरेच जण आता आपली काळजी घेऊन घराच्या बाहेर पडत आहेत. त्यामुळे दरवर्षी आमच्याकडून खरेदी करणारा ग्राहक येऊ लागला आहे. पण, दरवर्षी जितका फायदा होतो तितका यंदा फायदा झालेला नाही. – शिल्पा पौवार; महिला बचत गट


हेही वाचा – ई कॉमर्स कंपन्यांचे 52 हजार कोटींचे टार्गेट


 

- Advertisement -