घरक्राइमPMC बॅंक प्रकरण : प्रवीण राऊतांच्या मालमत्तेवर ईडीची टाच, वर्षा राऊतांच्या अडचणीत...

PMC बॅंक प्रकरण : प्रवीण राऊतांच्या मालमत्तेवर ईडीची टाच, वर्षा राऊतांच्या अडचणीत वाढ

Subscribe

ईडीने प्रवीण राऊत यांची जवळपास ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीच्या नोटीसीवरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असताना आता राऊत यांच्या जवळचे मानले जाणारे प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. प्रवीण राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जवळपास ७२ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. प्रवीण राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे आता वर्षा राऊत यांच्या समोरील अडचणींमध्ये भर पडणार आहे. याआधीच वर्षा राऊत यांना ईडीने पीएमसी बॅंक प्रकरणात ५५ लाख रूपयांच्या व्यवहारासाठी नोटीस पाठवली होती. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी वर्षा राऊत यांना ५५ लाख रूपयांची रक्कम कर्ज स्वरूपात हस्तांतरीत केली होती. याच प्रकरणात वर्षा राऊत यांना ईडीने २८ जानेवारीपर्यंत हजर राहण्यासाठी सांगितले होते. पण वर्षा राऊत यांनी अतिरिक्त वेळ मागितल्यानंतर ईडीने त्यांना ५ जानेवारीपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पीएमसी बँक घोटाळ्याची चोकशी सुरु आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ईडीने प्रवीण राऊत यांना समन्स बजावत चौकशी केली होती. या चौकशीनंतर काही दिवसांपूर्वी ईडीने प्रवीण राऊत यांना अटकही केली होती. या अटकेनंतर आता ईडीने प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात समन्स बजावले होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले होते.

राऊत यांच्या पत्नीची ५ जानेवारीला ईडीकडून होणार चौकशी

ईडीने वर्षा राऊत यांना मंगळवारी २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, वर्षा राऊत यांनी ईडीला अर्ज करून ५ जानेवारीपर्यंत मुदत देण्याची विनंती केली होती. ती मान्य करताना ईडीने वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्यास सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात ३,५२४ नवे रुग्ण, ५९ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -