Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: संजय राऊत सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला

Live Update: संजय राऊत सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत हे शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर भेटीसाठी गेले आहेत. हि भेटीमागचं कारण अद्याप समजलेले नाही.


पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मिनी बस आणि ट्रकच्या धडकेत हा अपघात झाला. दावणगिरी इथून गोव्याला जाणाऱ्या बसला हा अपघात झाला आहे. अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


- Advertisement -

मुंबईत आज कोरोना लसीकरणाचा तिसरा ड्राय रन होणार आहे. लसीकरण सेंटर्स वाढविण्यासाठी आणखी सहा ठिकाणी आज ड्राय रन घेण्यात येणार आहेत.


राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. १ लाख २४ हजार ८१० जागांसाठी मतदान केले जाणार आहे. संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.


- Advertisement -

धनंजय मुडें राजीनामा देणार नाहीत. राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


पुण्यातील भोसरी जमीन घोट्याळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार. ३० डिसेंबर २०२० रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगितले होते. (सविस्तर वाचा)

- Advertisement -