घरताज्या घडामोडीवीज कंपन्यातील कर्मचार्‍यांना बोनस देण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा

वीज कंपन्यातील कर्मचार्‍यांना बोनस देण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा

Subscribe

राज्य वीज मंडळाच्या तिन्ही कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना बोनस देण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. राऊत यांनी ट्विट करून घोषणेची माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात आणि ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात ऊर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन ऊर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली.

ऊर्जामंत्र्यांच्या या घोषणेमुळे वीज कर्मचार्‍यांचा घोषित झालेला संप रहीत झाला आहे. गतवर्षी देण्यात आला तितकाच बोनस दिला जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस मिळणार आहे.

- Advertisement -

वीज कंपन्यातील कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून ही रक्कम किती असेल, हे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल, असे राऊत म्हणाले. सर्व संघटनांनी आपला संप रद्द करून वीज ग्राहकांना त्रास होईल, असे कृत्य करू नये असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले होते. महावितरणमधील ७५०० पदांवरील नियुक्ती पत्र जारी करण्याचे आदेश मी आज ऊर्जा विभागाला दिले आहेत. उपकेंद्र सहाय्यक, पदवीधर आणि पदविकाधारक शिकाऊ अभियंता, ज्युनियर इंजिनिअर, आदी पदांवरील नियुक्तीचे आदेश लगेच जारी होतील, अशी माहितीही ट्विटद्वारे ऊर्जामंत्री राऊत यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -