ठाण्याचे माजी महापौर संजय मोरेंना कोरोनाची लागण

ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांंना कोरोनाची लागण झाली आहे.

corona
कोरोना

ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात असून त्यांच्यावर मुलुंड येथील एका खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे ते घरीच होते. डॉक्टरांनी देखील संजय मोरे यांना औषधे दिली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी कोरोनाची चाचणी केली. चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांची बायपास झाली असल्याने डॉक्टर देखील त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे. तर सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तींयांनी सांगितले आहे.

तर देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २३,८१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ३२५ रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ९,६७,३४९ वर पोहोचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १३,९०६ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६,८६,४२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,५२,७३४ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा – महापालिकेचे कंगनाकडे लक्ष, हाडे मोडणार्‍या खड्ड्यांकडे दुर्लक्ष!