Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठाणे - आग विझवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जवानांसह सात जण जखमी

ठाणे – आग विझवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जवानांसह सात जण जखमी

Related Story

- Advertisement -

ठाण्यात वागळे इस्टेट परिसरात एका रिक्षाच्या स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला शनिवारी रात्री ११.३०च्या सुमारास भीषण आग लागली होती. त्यामुळे या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यास सुरुवात केली, पण यादरम्यान अचानक एका घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात अग्निशमन दलाचे दोन जवानांसह सात जण जखमी झाले आहेत. या जखमींना त्वरित ग्लोबल रुग्णालय उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील राम नगर रोड क्रमांक २८ येथील एका रिक्षाच्या स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला काल रात्री भीषण आग लागली. यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच यावेळी अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. यादरम्यान अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आणि अग्निशमन दलाच्या दोन जवान आणि एक क्यूआरव्ही चालकासह सात जण जखमी झाले आहेत. शरद कदम (५६) आणि दीपेश पेटकर (२६) अशी जखमी जवानांची नावे आहे. तर क्यूआरव्ही चालक प्रसाद सुतार (२५) यांच्यासह नितीन कदम (२०), केशव सकपाळ (५५), रोहन पांढरे(२१) आणि मंगेश कदम (४०) हे स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

कदम यांच्या हाताला तर दीपेश यांच्या डोक्याला तर प्रसाद याच्या पायाला तसेच नितीन यांच्या हाताला, केशव याच्या डोक्याला, रोहन याच्या हाताला तसेच मंगेश याच्या नाकाला दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात नेले आहे, अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली. सिलेंडरच्या भडक्यात हे सर्व जण जखमी झाले असून ते किरकोळ जखमी असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस, अग्निशमन दल, एमएससीबी, ठामपा आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली. या स्फोटमुळे आजूबाजूची तीन ते चार दुकानं जळून खाक झाली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.


हेही वाचा – सुन्न… मातांचा आक्रोश भंडारा जिल्हा रुग्णालय आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू


- Advertisement -

 

- Advertisement -