CoronaVirus: दक्षिण मुंबईत डबे देणारी महिला करोना पॉझिटिव्ह

Mumbai
coronavirus in mumbai

दक्षिण मुंबईतील कॉरपोरेट ऑफिसेसना जेवणाचे डबे पोहोचवणारी एक ६५ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह आढळली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच काही लोकांना शोधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक काम करत आहे.

मुंबई मनपाच्या ग दक्षिण प्रभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी सांगितले की, या महिलेच्या जवळच्या लोकांच्या रिपोर्ट्स अजून यायचे बाकी आहेत. मंगळवारी याच परिसरातील एक २५ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र त्यानंतर त्याची पुन्हा चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले होते. हा तरुण घाटकोपर येथे तंबाखू विकण्याचे काम करत होता.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here