घरताज्या घडामोडीरायगडला पावसाने झोडपले, १७ धरणे भरून वाहू लागली!

रायगडला पावसाने झोडपले, १७ धरणे भरून वाहू लागली!

Subscribe

पुढील दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड शहरात पुराचे पाणी घुसले. धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरणांमधील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. १७ धरणे भरून वाहू लागली आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ११५.७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत सरासरी १६७०.०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या ५१.९२ टक्के पाऊस पडला आहे. रात्री पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महाड शहरात पाणी घुसले. फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, घोटवडे, कवेळे, उन्हेरे, कडकी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, भिलवले, मोरबे, कलसेते मोकाशी, साळोख ही धरणे पूर्णपणे भरून वाहू लागली आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने ४ ते ६ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नदी किनार्‍यावरील, तसेच दरडी कोसळण्याच्या शक्यता असलेल्या गावातील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याबाबत प्रशासन काळजी घेतच आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसात लेप्टो स्पायरोसिसची धोका देखील जास्त आहे. त्यामुळे जनतेने काळजी घ्यावी. पुराच्या पाण्यात फिरू नये. पुराच्या अथवा साचलेल्या पाण्यात गेला असाल तर जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. जिल्ह्यात लेप्टोची औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. जनतेने निष्काळजीपणा करू नये.

– निधी चौधरी, जिल्हाधिकारी

- Advertisement -

मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पडलेला पाऊस

अलिबाग ७९ मिलिमीटर, पेण ६०, मुरुड ९२, पनवेल ७२.८०, उरण १३४, कर्जत ६०.६०, खालापूर ६५, माणगाव १६०, रोहे, १९८, सुधागड १६०, तळे १२६, महाड ९६, पोलादपूर १९७, म्हसळे १६५, श्रीवर्धन ९८ आणि गिरिस्थान माथेरान ८७. एकूण १८५१.४०, सरासरी ११५.७१ मिलिमीटर.


हे ही वाचा – सावधान! Netflix तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -