फिशफ्राय नाही जमलं, म्हणून सूनेलाच मारून नदीत फेकलं!

in laws killed daughter in law for not making fish bihar supaul
फिशफ्राय नाही जमलं, म्हणून सूनेलाच मारून नदीत फेकलं!

मासे बनवायला जमलं नाही म्हणून सासरकडच्यांनी सूनेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या सुपौल येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर सूनेचा मृतदेह एका पोत्यात बांधून तो नदीत फेकल्याचे माहिती मिळाली आहे.

जेव्हा माहेरच्यांना मुलीची कोणतीही माहिती मिळाली नाही. तेव्हा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार महिलेचा मृतदेहाचा शोध घेतला असून तिची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती आणि इतर सासरच्यांच्या मंडळींना अटक केली आहे.

कोसी नदीत मिळाला महिलेचा मृतदेह

रतनपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोसी पूर्व तटबंध ढांढा गावाजवळील कोसी नदीत दोन दिवस आधी पोत्यात बांधलेला महिलेचा मृतदेह सापडला. मग लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर तिची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले गेले.

मृतदेह सापडलेल्या महिलेची ओळख पटली. सुनीला देवी असे त्या महिलेचे नाव होते. काही दिवसांपूर्वी या महिलेच्या घराच्यांनी ती गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी सुनीला देवीचे वडील विशुनदेव पासवान यांनी पोलिसांना सांगितले की, मार्च २०२०मध्ये मुलीचे लग्न सातनपट्टी पंचायतीच्या ढांढा गावाचा राहणार अमलेस पासवान यांचा मुलगा शिवेश पासवान यांच्याशी झाले होते.

दिवाळीनंतर जेव्हा माहेरचे मुलीला भेटायला गेले तेव्हा ती सासरी नव्हती. मग याबाबत सासरच्या मंडळींना विचारले तेव्हा ते विषय टाळू लागले. यानंतर माहेरच्यांना रतनपूर पोलीस ठाण्यात सुनीला देवी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली, तसेच त्यांनी संशय देखील व्यक्त केला.

दरम्यान रविवारी पूर्व कोसी तटबंदीच्या ढांढा जवळील कोसी नदीत पोत्यात बांधलेला एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून याबाबत विशुनदेव यांना माहिती दिली. माहेरच्यांनी त्यांच्या मुलीला ओळखले. त्यानंतर संप्तत गावकऱ्यांनी रस्ता रोको केला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी लोकांची समजूत काढून सर्व प्रकरण शांत केले आणि महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला.

पोलिसांनी आरोपी पती शिवेश आणि सासरे अमरेश पासवान यांना काल रात्री छापा टाकून रतनपुरा भागातून अटक केली. पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी केली असता त्याने पत्नीचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याचे कबुल केले. त्याचवेळी हत्येचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, ‘पत्नी सुनीला देवी मासे बनवू शकत नाही, या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे.’ यामुळे सुनीलाने आपल्या पतीशी वाद घालण्यास सुरुवात केली. म्हणून पती संतापला आणि त्याने पत्नीचा खून केला. यामध्ये सासरच्यांचा देखील हात होता. रतनपुरा पोलास प्रमुख रणवीर कुमार राऊत यांनी सांगितले की, ‘तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांना तुरूंगात पाठविण्याची कारवाई केली जात आहे.’


हेही वाचा – BMWवर लघुशंका केल्याने हटकले; म्हणून पेट्रोल टाकून जिवंत जाळले