घरताज्या घडामोडीकोरोनाच्या संकटातही सोने खरेदीला तेजी

कोरोनाच्या संकटातही सोने खरेदीला तेजी

Subscribe

भारतात २० हजार कोटींची विक्रमी विक्री

कोरोनाच्या काळात सोन्यातली सुरक्षित गुंतवणूक हा ट्रेंड दीपावलीच्या निमित्ताने धनत्रयोदशीलाही पाहायला मिळाला. २०१९ च्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोन्याची ३० टक्के अधिक इतकी विक्री झाली. ग्राहकांकडून यंदाच्या धनत्रयोदशीच्या निमित्ताने २० हजार कोटींपर्यंत सोन्याची विक्री झाली अशी माहिती आयबीजेए या ज्वेलर्स संघटनेकडून देण्यात आली आहे. यंदाच्या धनत्रयोदशीच्या निमित्ताने भारतीय बाजारात ४० टन इतकी सोन्याची म्हणजे २० हजार कोटींची विक्री झाली.

गेल्या वर्षी २०१९ मध्ये सोन्याची विक्री १२ हजार कोटी इतकी झाली होती. तर यंदाच्या वर्षी हा आकडा २० हजार कोटींवर जाऊन पोहचला आहे. गेल्या वर्षीच्या ३० टन सोने विक्रीच्या तुलनेत यंदा ४० टन सोन्याची विक्री झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला ट्रेंड पहायला मिळाला आहे. यंदा सोन्याची विक्री ३० टक्के ते ३५ टक्क्यांनी वाढली आहे. तर सोन्याची किंमत ही ७० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या ८ महिन्यांत लॉकडाऊनमुळे सोन्याच्या खरेदीवर मर्यादा आल्या होत्या.

- Advertisement -

पण दिवाळसणाच्या निमित्ताने सोने खरेदीचा चांगला ट्रेंड पहायला मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून सोने चांदी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सोन्याच्या किमतीने एकेकाळी ५६ हजार रुपये इतकी किंमत गाठली होती. पण सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पहायला मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -