घरताज्या घडामोडीब्राह्मोस क्षेपणास्त्राची भारत करणार निर्यात

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची भारत करणार निर्यात

Subscribe

फिलिपिन्स ठरणार पहिला ग्राहक

भारत हा शस्त्रास्त्रांचा आयातदार देश म्हणून मानला गेला आहे. आपण आतापर्यंत फ्रान्स, अमेरिका, रशियाकडून शस्त्रास्त्रांची आयात करत होतो; पण आता परिस्थिती बदलली आहे. भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार देश म्हणून नवी भरारी घेत आहे. आपल्या ताफ्यातील ब्राह्मोस हे क्रूझ क्षेपणास्त्र लवकरच भारत फिलिपिन्सला विकणार आहे. २०२१ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘ब्राह्मोस’च्या निर्याती संदर्भात महत्त्वाचा करार होऊ शकतो. हा करार प्रत्यक्षात आल्यास फिलिपिन्स हा ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेणारा भारताचा पहिला ग्राहक ठरेल.

‘ब्राह्मोस’ हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस एरोस्पेसची एक टीम पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये या करारासंदर्भात मनिलाला जाऊ शकते. दोन्ही देशांमध्ये हा करार होण्याआधी काही मुद्दे आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी ही टीम मनिलाला जाणार आहे. फिलिपिन्सच्या लष्कराला जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणार्‍या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राच्या आवृत्तीचा पुरवठा करण्यात येईल.

- Advertisement -

या करारामध्ये काही छोटे मुद्दे आहेत, ते दूर करुन पुढच्यावर्षी होणार्‍या परिषदेत या कराराला अंतिम मान्यता देण्याचा प्रयत्न आहे असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका अधिकार्‍याने सांगितले. नरेंद्र मोदी आणि रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्या परिषदेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. फेब्रुवारी महिन्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे. संरक्षणासह अन्य करारही या बैठकीत होतील.

हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्राह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ३०० किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्ट्या उद्ध्वस्त करू शकते.या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्राह्मोसमधून होणारा हल्ला अधिक घातक असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -