घरताज्या घडामोडीBreaking: पतियाळामध्ये हवाई दलाचे विमान कोसळले; पायलटचा मृत्यू

Breaking: पतियाळामध्ये हवाई दलाचे विमान कोसळले; पायलटचा मृत्यू

Subscribe

भारतीय हवाई दलाचे वैमानिक जीएस चिमा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. पंजाबच्या पतियाळा येथे विमान कोसळून दुर्घटना घडली. हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पतियाळा येथे आज सकाळच्या सुमारास आर्मी कटोंन्मेंट परिसरात एक मायक्रो लाईट एअरक्राफ्ट कोसळले. ज्यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला तर इतर दोन एनसीसीचे कॅडेट जखमी झाले आहेत.

प्रशिक्षणासाठी असलेले हे विमान पतियाळा एव्हिएशन क्लब विमानतळावरुन सकाळी ११.३० च्या दरम्यान उडाले होते. नंतर त्याचा अपघात झाला. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमींना लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -