घरIPL 2020IPL 2020: यामुळे विजेत्या टीमला मिळणार ५० टक्के बक्षिसाची रक्कम!

IPL 2020: यामुळे विजेत्या टीमला मिळणार ५० टक्के बक्षिसाची रक्कम!

Subscribe

आयपीएल (IPL) २०२० च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC)चा पराभव करत मुंबई इंडियन्स (MI)ने पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली. मुंबई इंडियन्सनं सलग दुसऱ्यांदा तर एकूण पाचवेळा आयपीएलच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सनं २०१३, १०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

- Advertisement -

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं दाखवून दिलं की, आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीमपैकी आपली टीम एक आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामाच्या अंतिम सामन्यानंतर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. दरम्यान आयपीएल चॅम्पियन टीमला २० कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येते. तसेच अंतिम सामन्यात हरलेल्या टीमला १२.५ कोटी रुपये इतकी रक्कम मिळते. पण यावर्षी कोरोनामुळे विजयी ठरलेल्या मुंबई इंडियन्सला ५० टक्केच म्हणजे १० कोटी रुपये रक्कम मिळणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला ६.२५ कोटी रुपये मिळणार आहेत.

या आयपीएलच्या १३व्या हंगामात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या टीमला प्रत्येकी ५ कोटी रक्कम देण्यात येणार आहे.

- Advertisement -

यंदा कोरोनाचा काळ असल्यामुळे बीसीसीआयला आयपीएलची आयोजना करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागता. तसेच यावर्षी आयपीएल ६ महिने उशिरा आणि प्रक्षेकांशिवाय खेळवण्यात आली. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारता ऐवजी दुबईत आयपीएलचे सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय भारत-चीन सीमावादानंतर चिनी कंपनी विवोकडून आयपीएलचं टायटल स्पॉन्सर काढलं. त्यानंतर ड्रीम इलेव्हनच्या स्वरुपात आयपीएलसाठी नवा टायटलसाठी स्पॉन्सर मिळाला. माहितीनुसार, विवो वर्षाकाठी बीसीसीआयला ४५० कोटी रुपये देत होती, पण आता ड्रीम इलेव्हनने एका हंगामासाठी केवळ २०० कोटी रुपये दिली. या सर्व कारणांमुळे बीसीसीआयचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे बक्षीच्या रक्कमेत ५० टक्के करण्यात आली.

कोण किती वेळा ठरले आयपीएल चॅम्पियन

मुंबई इंडियन्स – ५ वेळा विजयी (२०१३, १०१५, २०१७, २०१९ आणि २०२०) कर्णधार – रोहित शर्मा

चेन्नई सुपर किंग्स – ३ वेळा विजयी (२०१०, २०११ आणि २०१८) कर्णधार – महेंद्र सिंह धोनी

कोलकाता नाइट रायडर्स – वेळा विजयी (२०१२ आणि २०१४)

सनरायजर्स हैदराबाद – १ वेळा विजयी (२०१६) कर्णधार – डेविड वॉर्नर

डेक्कन चार्जर्स – १ वेळा विजयी (२००९) कर्णधार – अॅडम गिलक्रिस्ट

राजस्थान रॉयल्स – १ वेळा विजयी (२००८) कर्णधार – शेन वॉर्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -