Live Update : Appleने आपल्या ८ फॅक्ट्रीज चीनमधून भारतात हलवल्या

Live Update News

भारत-चीन सीमावादावरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान भारत चीनला जशास तसे चोख उत्तर देत आहे. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने एक मोठे पाऊल उचलले असून चीनमध्ये असलेला आपला टीव्ही कारखाना बंद करण्याचा निर्णय सॅमसंगने घेतल्यानंतर आता जगातली सर्वात मोठी टेक कंपनी Apple ने देखील चीनला मोठा झटका दिला आहे. Appleने आपल्या ८ फॅक्ट्रीज चीनमधून भारतात हलवल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. ते व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधत होते.


ज्येष्ठ खगोलशास्त्र डॉ. गोविंद स्वरुप यांचे निधन

भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे उद्गाते आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांचे सोमवारी रात्री नऊ वाजता पुण्यात निधन झाले आहे. भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणून डॉ. गोविंद स्वरुप यांना मानले जायचे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अशक्तपणा आणि इतर आजारामुळे गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.


दिलासा! राज्यातील Recovery Rate ७१.३८%

राज्यात कोरोना विषाणूचा कहर मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील नव्या रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ कायम आहे. मात्र अशापरिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३८% एवढे झाले आहे. आज १४,९२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६,५९,३२२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


दिवसभरात आढळले २ हजारहून अधिक रुग्ण

पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात सोमवारी दिवसभरात तब्बल २ हजार ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ७ हजार ९५८ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ६३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ८८ हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.


कोरोनाला अटकाव करण्यासाठी माफक दरात आणि कमीतकमी वेळेत चाचणी होण्याची गरज लक्षात घेण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. या भूमिकेनुसार आरोग्य विभागाने तातडीने याचा आढावा घेतला असून ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा दर आता १२०० रुपये एवढा कमी केला आहे.


दीपक कोचर यांना अटक; व्हिडीओकॉन ICICI प्रकरणी ईडीची कारवाई

आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने अटक केली आहे. आयसीआयसीआय बँक व्हिडीओकॉन प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. यासंदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे.


पोलीसबाधितांच्या संख्येत घट

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तसेच या कोरोनाचा विळखा आता कोरोना योद्धांमध्ये होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसाठी या संकटात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाची लागण होताना दिसत आहे. मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे पोलिसांना होणाऱ्या कोरोनाच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यातील १७९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.


राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तसेच या कोरोनाचा विळखा आता कोरोना योद्धांमध्ये होताना दिसत आहे. सामान्य नागरिकांसाठी या संकटात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाची लागण होताना दिसत आहे. मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे पोलिसांना होणाऱ्या कोरोनाच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यातील १७९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.


सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची कोरोना चाचणी अखेर निगेटिव्ह आली असल्याची माहिती त्यांचे पुत्र एस. पी. चरण यांनी दिली आहे. तसेच बालसुब्रमण्यम यांच्या प्रकृतीबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. बालसुब्रमण्यम यांना फुफ्फुसाचा आजार झाला असून अजूनही त्यांची प्रकृती जैसे थे असल्याचे चरण म्हणाले, मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून ही एक दिलासादायक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत, याबाबतचे ट्विट एएनआयने केले आहे.


चायनीज टिव्ही फॅक्ट्री बंद करणार Samsung

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने एक मोठे पाऊल उचलले असून चीनमध्ये असलेला आपला टीव्ही कारखाना बंद करण्याचा निर्णय सॅमसंगने घेतला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये, चीनमधील तियानजिन शहरात सॅमसंगचे टीव्ही प्रॉडक्शन युनिट बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अहवालानुसार या कारखान्यात सुमारे ३०० लोकं काम करतात आणि चीनमधील हा एकमेव सॅमसंग टीव्ही कारखाना आहे, जरी सॅमसंगने कामगारांच्या संख्येवर कोणतेही भाष्य केलेले नसले परंतु काही लोकांना नोकरी दिली जाईल हे निश्चितपणे कंपनीने म्हटले आहे.


विवाह समारंभासाठी नवे आदेश जाहीर

पुण्यात कोविड-१९ च्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात विवाह समारंभांसाठी नव्याने आदेश जाहीर केले आहेत. महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘मिशन बिगेन अगेन’चा भाग म्हणून जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगानेच नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे.


ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.


रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणीवर दाखल केला फसवणूकीचा गुन्हा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियंका सिंह आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतर काही लोकांविरोधात बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रियाने एनडीपीएस कायदा आणि टेली मेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शकतत्त्वे २०२० च्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. ड्रग चॅट प्रकरणात रिया चक्रवर्तीवर सध्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) कडून चौकशी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, या प्रकरणात रियाला अटक केली जाऊ शकते.


सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे


उपनगरीय रेल्वे लोकल सेवा सुरू करा, या मागणीसाठी विरार रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी प्रवाशांनी उत्स्फुर्तपणे आंदोलन केले. हजारो प्रवासी यावेळी घोषणा देत रेल्वे रुळावर आणि परिसरात उतरले होते.


वाढीव वीज बिलाविरोधात मनसेने केलेल्या आंदोलनानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी ग्रुपचे सीईओ आणि वरिष्ठांशी कृष्णकुंजवर चर्चा केली. लॉकडाऊननंतर अनेकांच्या रोजगार, व्यवसायावर परिणाम झाला असताना, वाढीव बिलामध्ये दिलासा द्यावा आणि तात्काळ सरकारशी बोलून किंवा स्वतः कंपन्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असं राज ठाकरे यांनी अदानी ग्रुपला सांगितलं.


संख्याबळाच्या आधारे विधेयक रेटणे चुकीचं, हा चुकीचा पायंडा आम्ही सहन करणार नाही, ग्राम पंचायत प्रशासक नेमण्याच्या विधेयकावर देवेंद्र फडणवीसांचा जोरदार आक्षेप


हे बिल वेगळं आहे, कोर्टात निकाल लागला तर तो पाळला जाईल, विरोधी पक्षांनी याची गल्लत‌ करु नये : अजित पवार


११ आक्टोबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे.तसंच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा २२ नोव्हेंबरला होईल, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा १ नोव्हेंबरलाच होणार


विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशाला सुरुवात झाली आहे, कोरोनाच्या नियमांसह विधानसभेचं कामकाज सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली कामकाजाला सुरुवात झाली आहे.


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारताने ब्राझीलला देखील मागे टाकले आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्येन आता ४२ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. तर, मागील २४ तासांमध्ये तब्बल ९० हजार ८०२ नवे कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२ लाख ४ हजार ६१४ वर पोहचली आहे.


नागपुरचे माजी आयुक्त यांना कोरोनाची लागण झाली होती. आता तुकाराम मुंडे कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.


काल रिया चक्रवर्तीची NCB कडून कसून चौकशी झाल्यानंतर, आझ पुन्हा एकदा रियाची चौकशी होणार आहे. आजच्या चौकशीसाठी रिया घरातून रवाना झाली आहे.


२३ हजार ३५० नवे कोरोनाबाधित

राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. तब्बल २३ हजार ३५० नव्या कोरोनाबाधितांची आज नोंद झाली. तर ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ७ हजार २१२ वर पोहचली. तर, ७ हजार ८२६ जणांनी आज कोरोनावर मात केली आहे.