लंडन एक्स्टेन्शनच्या धर्तीवरच सीप्झ स्टेशन उभे राहणार, उद्धव ठाकरे करुन दाखवणार

सीप्झ स्टेशनची मेट्रो 6 आणि मेट्रो 3 ही कनेक्टिव्हिटी प्रकल्पाच्या फिजिबिलिटीच्या दृष्टीने शक्य नसल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. एखादी भुयारी मेट्रो एखाद्या उन्नत प्रकल्पाशी जोडणे हे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. पण आता फडणवीस यांचा दावा खोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. मेट्रोची इंटरकनेक्टिव्हिटी घडवून आणण्यासाठी लंडन एक्ेस्टेन्शन प्रकल्पाच्या धर्तीवरच आता हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्पातील मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गला विकसित होणार असल्यानेच सीप्झ हे कॉमन इंटरकनेक्टिव्हिटीचे स्टेशन असणार आहे. मेट्रो मार्ग 3 आणि मेट्रो मार्ग 6 दरम्यानच्या कनेक्टिव्हिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पण वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी मात्र अशा स्वरूपाची कनेक्टिव्हिटी शक्य आहे, असे स्पष्ट केले आहे. मुंबईसारख्या जागेची चणचण असणार्‍या शहरात कॉमन फॅसिलिटीचा वापर करूनही पैसा वाचवता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापुढच्या काळात प्रकल्पाचे डिझाईन त्या दृष्टीने करावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सीप्झ स्टेशन इंटरकनेक्टिव्हिटी फिजिबल होण्यासारखे आहे. मेट्रो कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला विशिष्ट स्वरूपाचा असा स्लोप लागतो. साधारणपणे जमिनीखालून ते एलिव्हेटेड रेल प्रकल्प असा 6 टक्के ते 8 टक्के इतका स्लोप आवश्यक असतो. मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या प्रकल्पादरम्यान हा स्लोप निर्माण करणे शक्य असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक दातार यांनी सांगितले. या ठिकाणी पुरेशी जागा असल्याने हा प्रकल्प इंटरकनेक्ट करणे शक्य होईल.

सीप्झसारख्या ठिकाणी मेट्रो इंटरकनेक्ट करणे हे दुहेरी फायद्याचे आहे. दोन्ही मेट्रो मार्गांसाठी ही कॉमन अशा स्वरूपातील सुविधा असेल. प्रकल्प कोणताही असो मेट्रो वाहिन्यांसाठी मेट्रो ट्रेन ऑपरेट करणे शक्य होईल. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांसाठी वेगवेगळे पैसे मोजण्याची गरज नाही. या सगळ्या घडामोडीत ही गोष्ट विसरता कामा नये म्हणजे 2015 मध्ये टेक्निकल कमिटीने कांजुरमार्गच्या जागेसाठीच प्राधान्य दिले होते.

कांजुरमार्गचा कारशेडसाठीचा पर्याय आधीच अवलंबला असता तर आतापर्यंत कारशेड तयार झाले असते, असेही त्यांनी सांगितले. लंडन एक्सटेन्शन प्रकल्पात भुयारी आणि एलिव्हेटेड (उन्नत) मेट्रो प्रकल्पात अशा पद्धतीची तंत्रज्ञानाची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतही अशा दोन्ही पद्धतीच्या भुयारी आणि उन्नत मेट्रो मार्गांची कनेक्टिव्हिटी अशक्य नाही. दोन्ही प्रकल्पाची डिझाईन तुम्ही कशी करता हे महत्त्वाचे असणार आहे. आधीच मुंबईत जागेची कमतरता आहे.

अशातच दोन्ही मेट्रोसाठी कॉमन स्वरूपाची जागा वापरणे महत्त्वाचे असणार आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये इकॉनॉमिकली सेन्सेटिव्ह जागेत त्यांनी इतका विचारही केला नसता आणि प्रकल्प पुढे नेला असता. पण भारतात अनेक शॉर्टकर्टचा वापर करत वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेण्यात आले. आरे कारशेडच्या जागेची कमर्शिअल व्हॅल्यू पाहता त्या जागेची निवड कांजुरमार्ग करण्यात आली. बॅकबेची जागाही सुरुवातीला चर्चेत होती; पण त्या जागेचा वापर महागड्या दरामुळे करता येणार नव्हता. तुलनेत आरेची जागा कमर्शिअल पद्धतीने वापरण्यासाठी आणखी वाव होता. म्हणूनच आरेची जागा वरचढ ठरली, असेही त्यांनी सांगितले.

उद्धवजी आता करूनच दाखवा
=2015 साली टेक्निकल समितीने कांजुरमार्गला दिले होते प्राधान्य
=लंडनच्या एक्स्टेन्शन प्रकल्पात भुयारी – उन्नत मार्गाचा प्रयोग
=दोन्ही रेल्वेच्या मार्गांसाठी कॉमन सुविधांचा वापर शक्य
=भुयारी – उन्नत दोन प्रकल्पांसाठी एकच जमिनीचा वापर करणे शक्य
=या क्षेत्रातील एक्स्पर्ट यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठिंबा