पत्नीचं मुंडकं घेऊन हैवान २ किलोमीटर चालतचं राहिला, मग गाठलं पोलीस ठाणं!

man beheads wife and take her head to police station uttar pradesh banda
पत्नीचं मुंडकं घेऊन हैवान २ किलोमीटर चालतचं राहिला, मग गाठलं पोलीस ठाणं!

शुक्रवारी सकाळी पतीने पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयावरुन धक्कादायक पाऊलं उचल्याचं समोर आलं आहे. पतीनं संशयापोटी आपल्या पत्नीचं मुंडकं कापून ते घेऊन तो थेट पोलीस ठाण्यात गेल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे. हा हैवान पती जवळपास २ किलोमीटर भररस्त्यात आपल्या पत्नीचं मुंडकं घेऊन चालत होता. हे प्रकरण बबेरू ठाणा क्षेत्रातील ग्रामीण परिसरातील नेतानगरमधील आहे.

या आरोपी पतीचे नाव किन्नर (वय ३५) असून पत्नीचे नाव विमला (वय २८) असे होते. पतीचा विमलावर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे आज सकाळी ६ वाजता त्याने गळा आवळून आणि तिच्यावर वार करून हत्या केली. या घटनेत अजून एक व्यक्ती जखमी झाला असून तो महिलेचा प्रियकर असल्याचं म्हटलं जात आहे.

वरिष्ठ सहाय्यक पोलीस महेंद्र चौहान यांनी याप्रकरणी सांगितलं की, आरोपी पती कापलेले मुंडकं घेऊन स्वतः पोलीस ठाण्यात आला आणि बोलला की, ‘मी माझ्या पत्नीचं मुंडकं कापलं आहे.’ त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान महिलेचा पोस्टमॉर्टम केलं जात असून तिच्या जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केलं आहे.

दम्यान आरोपी पती रक्तानं माखलेला टीशर्ट, काळी पॅन्ट, एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात पत्नीचे मुंडकं घेऊन भररस्त्यातून जात होता. यामुळे पूर्ण परिसरात खळबळ माजली होती. काही लोकांनी याचा व्हिडिओ देखील केला. याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. महिलेचं शरीर आणि मुंडकं एकत्र करून पोस्टमॉर्टम केलं जात आहे.