पत्रिकेत मंगळ असल्यामुळे सासरचे टोमणे मारायचे; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Suicide
आत्महत्या

पंजाबमधील जालंधर येथील आदर्श नगरमधील माहेरी राहणाऱ्या एका महिलेने पती आणि सासरच्यांना कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासरा आणि सासू विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मुलीचे वडील हरी सिंह यांनी सांगितले की,’ते जवळच्या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. २०१९मध्ये त्यांची मुलगी शिल्पाचे लग्न रामामंडी राहणाऱ्या सोनू सोबत झाले. लग्नानंतर शिल्पाचा पती आणि सासरचे तिला त्रास देत होते. तिला मंगळ असल्यामुळे सतत टोमण मारत होते. तिने हे पाऊल उचलण्यापेक्षा घटस्फोट घेतला असता तर चांगले झाले असते.’

पुढे ते म्हणाले की, ‘तिला जवळपास १ वर्ष अशा प्रकार त्रास देत होते. यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी २ दिवस अगोदर शिल्पा माहेरी येऊन राहू लागली आणि ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. ती सतत म्हणायाची की, सासरी तिला काहीच इज्जत नाही आहे. शनिवारी खोलीत बसलेल्या शिपल्पाची अचानक तब्येत खराब झाली. मग ते तिला सिव्हिल रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर तिचा मृत्यू झाला. शिल्पाने विष प्यायल्याने तिचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. जेव्हा हे समजले तेव्हा शिल्पाच्या खोलीत एक सुसाइड नोट मिळाली. ज्यामध्ये तिने आत्महत्याचे कारण, तिचा पती आणि सासर असल्याचे लिहिले होते.’

सुसाइड नोटमध्ये लिहिले होते की, ‘मी शिल्पा आपले जीवन संपवण्यासाठी जात आहे. यासाठी जबाबदार माझे सासर आहे. त्यांनी लग्नानंतर मला खूप त्रास दिला.’ सुसाइट नोटवर रक्ताचे थेंब देखील मिळाले. पोलिसांनी सर्व सामान फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहे. पती आणि सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गिराधारी सिंह म्हणजे सासऱ्याला अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – मेव्हण्याने मेव्हणीचा खून करुन आत्महत्या केली; कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल