घरताज्या घडामोडीविस्तारवादी शक्तीमुळे जग त्रस्त मोदींची दिवाळी जैसलमेरमथ्ये जवानांसोबत

विस्तारवादी शक्तीमुळे जग त्रस्त मोदींची दिवाळी जैसलमेरमथ्ये जवानांसोबत

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाही जैसलमेर येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सीमेवरील बीएसएफचे जवानांसह दिवाळी साजरी करत दिवाळीनिमित्त त्यांना मिठाईचे वाटपदेखील केले. जैसलमेरमध्ये पोहोचल्यावर त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सीमेवरील जवान, सैनिकांचे कौतुक केले. तर जवानांमध्ये आल्यावरच दिवाळी सेलिब्रेशन पूर्ण होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सीमेवर सैनिक आहेत म्हणून देशात सण साजरे होत असल्याचे त्यांनी म्हटले.

माझे दिवाळीचे सेलिब्रेशन सैनिक जवानांशिवाय अपूर्ण आहे. देशाचे रक्षण करणार्‍या आणि राष्ट्र सुरक्षेसाठी तत्पर असणार्‍या जवानांना यावेळी मोदींनी नमन देखील केले. जग कितीही बदलले असेल, समीकरणे कितीही बदलली असतील तरीही सतर्कता हीच सुरक्षा आहे, सजगतेमुळेच सुख आणि समाधान येते, सामर्थ्यानेच विजय मिळतो आणि सक्षमतेनेच शांतता निर्माण होते, हे कधीही विसरून चालणार नाही. भारताकडे पराक्रमाची ताकद आणि इच्छाशक्ती दोन्हीही आहे. सीमा सुरक्षेपासून आपण कोणतीही तजतोड करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तुम्ही हिमाच्छादित डोंगराळ भागात किंवा वाळवंटात कुठेही असला तरी तुमच्यामध्ये आल्यावरच माझी दिवाळी पूर्ण होते. तुमच्या चेहर्‍यावरील समाधानाची भावना पाहिल्यावर माझा आनंद द्विगुणीत होतो. तुमच्या शौर्याचा समस्त भारतीयांना अभिमान आहे. जगातील कोणतीही ताकद आमच्या वीर जवानांना देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यापासून रोखू शकत नाही, असेही ते म्हणाले. ज्या देशांमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता खच्चून भरलेली असते तोच देश सुरक्षित असतो. त्याच देशाचा विकास होत असतो, असेही ते म्हणाले. यावेळी मोदी यांनी चीनचे नाव न घेता चीनवर हल्ला चढवला. आज संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींमुळे त्रस्त झाला आहे. विस्तारवाद ही मानसिक विकृती आहे. अठराव्या शतकातील मानसिकतेचे ते द्योतक आहे. त्याविरोधात भारत सातत्याने आपला आवाज बुलंद करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -