भयंकर! प्रेताविनाच दिला अग्नी

अखेर पतीने पत्नीवर वसईत ख्रिस्ती धर्मानुसार अंत्यसंस्कार केले. तर दुसऱ्या मुलाने सरणावर बाहुली ठेऊन प्रेताविनाच अग्नी दिला.

Mother's Dead Body set on fire without a corpse
प्रातिनिधिक छायाचित्र

एक कुटुंब हिंदू आणि ख्रिस्ती धर्मात विभागले गेल्याने मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्याच्या रितीरिवाजावरून घरात वाद झाला. त्यात गावकऱ्यांनीही उडी घेतली. पती आणि एका मुलाने ख्रिस्ती धर्मानुसार दफन करण्याचा निर्णय घेतला. त्याला दुसऱ्या मुलासह गावकऱ्यांनी विरोध केला. अखेर पतीने पत्नीवर वसईत ख्रिस्ती धर्मानुसार अंत्यसंस्कार केले. तर दुसऱ्या मुलाने सरणावर बाहुली ठेऊन प्रेताविनाच अग्नी दिला.

वाडा तालुक्यातील आवंढे येथील वयोवृद्ध महिला फुलाई दाभाडे (६५) या वयोवृद्ध महिलेचा वृद्धापकाळाने बुधवारी रात्री मृत्यू झाला. या महिलेला दोन मुले, एक मोठा आहे. मुलगा सुभाष हिंदू धर्म तर पती महादू दाभाडे व लहान मुलगा सुदाम दाभाडे यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला. त्यामुळे आईचा मृत्यू झाल्याने मोठ्या मुलाने हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे आईचा अंत्यविधी करायचा ठरवले. तर महिलेचा पती व छोट्या मुलाने ख्रिश्चन धर्मातील रितीप्रमाणे दफनविधी करायचे असे ठरले. यावरून दोघा भावंडात मोठा वाद झाला. गावकऱ्यांनीही दफनविधी करण्यास गावात विरोध केला. शेवटी पोलिसांनी पतीकडे प्रेत सुपूर्त केल्याने ख्रिश्चन धर्माप्रमाणे वसई येथील पाचुबंदर येथे प्रेताचा दफनविधी करण्यात आला. तर मोठ्या मुलाने सरण रचून त्यावर बाहुली ठेवून सरणाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पाडलेया घटनेची चर्चा तालुका भर पसरली असून चर्चेचा विषय बनली आहे.

तालुक्यातील आवंढे हे एक आदिवासी लोकवस्ती असलेले खेडेगाव आहे. या गावात महादू दाभाडे यांचे कुटुंब राहते. पत्नी फुलाई (६५) यांचा मोठा मुलगा सुभाष व लहान मुलगा सुदाम असे राहतात. गेल्या काही वर्षापूर्वी महादू, फुलाई व लहान मुलगा सुदाम यांनी खिश्चन धर्म स्विकारला आहे. बुधवारी रात्री फुलाई या वयोवृद्ध महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू झाल्याने मोठा मुलगा सुभाष याने हिंदू धर्मातील रीतिरिवाजाप्रमाणे आईला अग्नी द्यायचे ठरवले. तर छोटा मुलगा सुदाम याने ख्रिस्ती धर्माप्रमाणे आईचा दफनविधी करण्याचे ठरवले. यावरून दोघा भावंडांत बाचाबाची सुरू झाली.
गावकऱ्यांनीही यामध्ये उडी घेऊन गावात अंत्यसंस्कार करायचे असतील तर अंत्यसंस्कार हिंदू धर्माप्रमाणेच करावे लागतील अन्यथा गावच्या हद्दीत दफनविधी करू देणार नाही, असा पवित्रा घेतला. शेवटी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी मृत महिलेच्या पतीशी चर्चा करून पतीच्या इच्छेप्रमाणे दफनविधी करण्याचे ठरले. ग्रामस्थांनी जागेस नकार दिल्याने वसई येथील पाचुबंदर येथे महिलेचा दफनविधी करण्यात आला. शेवटी मोठ्या मुलाने गावातील स्मशानभूमीत सरण रचून त्यावर बाहुली ठेवून प्रेताविनाच सरणाला अग्नी दिला. या घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली असून चर्चेचा विषय बनली आहे.


हेही वाचा – २९ क्विंटल कांदा विक्री करणे पडले महागात; परस्पर कांदे खरेदी-विक्री करुन भामटा फरार