Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम डबेवाल्यांची फसवणूक; डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर अटकेत

डबेवाल्यांची फसवणूक; डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर अटकेत

डबेवाल्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक.

Related Story

- Advertisement -

डबेवाल्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक करण्यात आली आहे. तळेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घाटकोपर पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे समोर आले आहे.

काय केली फसवणूक?

डबेवाल्यांना सायकल ऐवजी मोफत दुचाकी देणार, असे सुभाष तळेकर यांनी सांगितले. त्यानंतर डबेवाल्यांकडून पैसेही घेतले. मात्र, पैसे देऊनही दुचाकी मिळत नसल्याने डबेवाल्यांनी अखेर घाटकोपर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच घाटकोपर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

नोकदारांना ऊन – पावसात देखील वेळेत जेवण पोहोचवणारे. तसेच मुंबईकरांचे पोट भागवण्यासाठी मुंबईकरांना वेळेवर डबा पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांनी स्पर्धेच्या युगात तग धरुन राहण्यासाठी नवनव्या संकल्पना स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी डबेवाल्यांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेने पुढाकार घेत नवी मुंबई मधून डबेवाल्यांसाठी मोपेडची खरेदी केली होती. विशेष म्हणजे एका मोपेडची किंमत पाच हजारांनी कमी केल्याने या डबेवाल्यांना दुचाकी स्वस्तात उपलब्ध झाली होती. एवढेच नाहीतर सायंकाळी काम संपल्यावर ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या वस्तू पोहोचविण्याची जबाबदारी जोड धंदा म्हणूनही हे डबेवाल्यांनी घेतली होती.


हेही वाचा – फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न; आयर्लंडमधून माहिती मिळताच पोलिसांनी वाचवले प्राण


- Advertisement -