घरताज्या घडामोडीअन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांची बदली

अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांची बदली

Subscribe

अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी पल्लवी दराडे यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आता मदत व पुनर्वसन सहसचिव ए.बी.उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला बदल्यांचा धुमधडाका आज पुन्हा पहायला मिळाला. राज्य सरकारतर्फे चार सनदी अधिकाऱ्यांचा बदल्यांचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी कार्यरत असलेल्या पल्लवी दराडे यांची बदली करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांच्या जागी मदत व पुनर्वसन सहसचिव ए.बी.उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, दराडे यांची नियुक्ती आता कोणत्या पदावर होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी आणखीन काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अखेर आज चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्यात ए.बी.उन्हाळे यांच्यासह रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी पदी लक्ष्मी मिश्रा यांची बदली करण्यात आली आहे. मिश्रा या पशुसंवर्धन यांच्या आयुक्त पदी कार्यरत होते. त्यांच्याशिवाय पवनीत कौर, यांची बदली आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदावर करण्यात आली आहे. तर वस्त्रोद्योग संचालक डॉक्टर माधवी खोडे चवरे यांची नियुक्ती जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -