घरताज्या घडामोडीयेत्या २४ तासात मुंबईसह ठाणे, रायगड, वसई-विरारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज - IMD

येत्या २४ तासात मुंबईसह ठाणे, रायगड, वसई-विरारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज – IMD

Subscribe

सायंकाळपर्यंत पावसाची तीव्रता कमी राहणार असून ढगाळ वातावरण आणि दृश्यमानता कायम राहणार

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईतील हवामान रविवारी देखील ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली . मात्र सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, वसई-विरार, जळगाव, नाशिक, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासह येत्या २४ तासात मुंबई, रायगड, ठाणे, वसई-विरारसह मध्य प्रदेशातील काही भागात आणि पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सायंकाळपर्यंत पावसाची तीव्रता कमी राहणार असून ढगाळ वातावरण आणि दृश्यमानता कायम राहणार असल्याची माहिती India Meteorological Department (भारत हवामान विभाग) ने दिली आहे.

- Advertisement -

आजही राज्याभर पाऊस कोसळणार असून अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे. आजही सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई-विरार, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढचे ३ ते ४ तास असाच पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर राज्यात उत्तर कोकणातही ढगाळ वातावरण आहे. पुढच्या ३ ते ४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. इतकंच नाही तर पुढच्या २४ तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ऐन थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी मुंबई परिसरासह कोकण विभागांत तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. आणखी एक ते दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता आहे.


मुंबईकरांनो, आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -