घरक्राइमयुपीत हाथरसची पुनरावृत्ती; बलात्कार करुन फुप्फुसावरही केला घाव

युपीत हाथरसची पुनरावृत्ती; बलात्कार करुन फुप्फुसावरही केला घाव

Subscribe

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरले आहे.

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरले आहे. उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हाथरसची घटना ताजी असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेश मधील बदायू जिल्ह्यामध्ये एका मध्यवयीन तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिला ठार मारण्यात आले आहे. याप्रकरणी बदायू जिल्ह्यातील उघैती या गावातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी सायंकाळच्या वेळेस मंदिरात गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही.

नेमके काय घडले?

गावातील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुासर, रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दोन इसमांसहित असलेल्या कार चालकाने एका तरुणीला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून पोबारा केला. त्यानंतर त्या पीडितीचे मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले. त्यानंतर हे देखील स्पष्ट झाले आहे की, या घटनेतील आरोपींनी पीडितीला कारमधून चंदौसी येथे रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र, तिचा त्यात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

पीडितेच्या नातेवाईकांचा आरोप

या घटनेतील पीडितेच्या नातेवाईकांनी आरोप देखील केला आहे की, तक्रार दाखल करुनही उघैती पोलीस ठाण्यातील ऑफिसर रविंद्र प्रताप सिंह वेळेवर दाखल झाले नाहीत. तसेच या पीडितेच्या मृत्यूनंतर तब्बल १८ तासांनी म्हणजे सोमवारी दुपारी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मंगळवारी आलेल्या रिपोर्टनुसार या पीडितीच्या गुत्पांगांच्या ठिकाणी अनेक जखमा आढळून आल्या होत्या. तसेच या पीडितेचे पाय, बरगडीही तोडण्यात आली. तसेच तिच्या फुप्फुसावर देखील घाव करण्यात आले. तसेच तीव्र रक्तस्त्राव देखील झाला होता आणि त्यातच पीडितेचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी याबाबत सामुहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी चार जणांची टीम बनवली आहे. या घटनेतील संशयित आरोपी महंत बाबा सत्यानारायण, त्याचा सहाय्यक वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल यांचा शोध सुरु आहे. त्यामुळे अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – डोक्यात दगड टाकून मित्राचा खून


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -