घरताज्या घडामोडीप्रतिनियुक्तीवरील वशिलेबाज गोत्यात

प्रतिनियुक्तीवरील वशिलेबाज गोत्यात

Subscribe

विभाग प्रमुखांनी ठोठावले मुख्यमंत्र्यांचे दार

मंत्र्यांच्या वशिलेबाजीने प्रतिनियुक्तीद्वारे मोक्याच्या जागा पटकावणार्‍या अधिकार्‍यांना त्यांच्या मूळ जागी पाठवण्यासाठी आता सगळ्याच विभागांनी कंबर कसली आहे. मूळ खात्यात परतण्यासाठी प्रयत्न करूनही वशिलेबाज अधिकारी विभाग प्रमुखाला जराही जुमानत नसल्याने विभागप्रमुखांनी या अधिकार्‍यांविरोधात आता थेट मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले आहे.

मंत्रालयीन प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर असताना मंत्री, राज्यमंत्री यांच्या कार्यालयांसह महानगरपालिकांमध्ये मोक्याच्या जागी प्रतिनियुक्तीवर जाणार्‍या अधिकार्‍यांमुळे मंत्रालयातील कामकाज उरकणे जिकरीचे होत असल्याच्या वाढत्या तक्रारी विभाग प्रमुखांनी केल्या आहेत.

- Advertisement -

विषयाचा संबंध नसलेल्या ठिकाणी नकोते अधिकारी प्रतिनियुक्तीवर जात असल्याने त्याचा परिणाम विविध खात्यांच्या कामावर होत आहे.

तांत्रिक विषयाशी संबंधित मंत्रालयातील अधिकारीही प्रतिनियुक्तीवर जाऊ लागल्याने कामाचा उरक रोखला गेला आहे, असा अहवाल सामान्य प्रशासन विभागाने याआधीच पाठवला होता. मात्र, या अधिकार्‍यांच्या पाठीशी मंत्री आणि पुढार्‍यांचा वशिल्याचा आशीर्वाद असल्याने अहवालानंतर त्यांचे काहीही बिघडले नाही. अशा अधिकार्‍यांना त्यांच्या मूळ जागी परत पाठवण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी सातत्याने पाठपुरावा करूनही काहीही फरक पडला नाही.

- Advertisement -

अखेर पशू संवर्धन विभागाने हे प्रकरण थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दरबारात पोहचवले आहे. या खात्यात २५७८ पदांची मान्यता आहे. यातील ५३२ पदे रिक्त असल्याने राज्यात अनेक ठिकाणी या विभागाची कामे रेंगाळली आहेत. विशेषतः पशू वैद्यकीय अधिकारी पदावरील अनेक अधिकारी आपले काम सोडून इतरत्र प्रतिनियुक्तीवर रुजू झाले आहेत. यामुळे राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पशू वैद्यकीय पदे अनेक वर्षे रिक्त आहेत. आठ अधिकार्‍यांनी वशिल्याने मंत्री आणि राज्य मंत्र्यांची कार्यालये गाठली आहेत.

तर जवळपास २० अधिकारी विविध महानगरपालिका आणि महामंडळावर प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. याने खात्याचे काम पुढे सरकत नसल्याचे विभाग प्रमुखांनी आजवरच्या आपल्या खात्याच्या मंत्र्यांना सांगितले. पण अधिकार्‍यांचा वशिला दांडगा असल्याने त्यांचे काहीही बिघडले नाही. अखेर हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचल्याने प्रतिनियुक्तीवरील अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -